shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहरे येथे मालोबा- बालोबा- मांगिरबाबा यात्रोत्सव आनंदाने साजरा..!

नगर । प्रतिनिधी :-  नगर तालुक्यातील देहरे गावचे ग्रामदैवत श्री मांगीर बाबा देवस्थान व श्री मालोबा-बालोबा देवस्थान कमेटी यांचेकडून यात्रा उत्सव मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा करण्यात आला. 

देहरे ग्रामपंचायत सदस्य  हाजि साजित भाई शेख या मुस्लिम बांधवाने उन्हाळ्यात सर्वांना पाणी पिता यावे या उदात्त हेतूने पाणपोईची व्यवस्था केली होती. 


कोरोनाने दोन वर्षे धुमाकूळ घातल्याने शासनाने यात्रेसाठी निर्बंध घातले होते. ते आता निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही यात्रा भरविण्यात आली होती. या उत्सवात  पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हिरहिरीने सहभाग घेऊन यात्रोत्सवाची शोभा वाढवली. 
मांगिरबाबा मंदिर  जाणार पुर्णत्वास...!

गेल्या दोन दिवसांमध्ये भाविकांनी मांगीर बाबा देवस्थान जीर्णोद्धारासाठी सढळ हाताने मदत केली.सुमारे 57439 एवढी रक्कम देणगी जमा झाली आहे.  तसेच मंदिराच्या मुख्य गाभार्याचे  राहिलेले काम पुर्णत्वास जाणार आहे.

धुलीवंदनाच्या दिवशी येथील ग्रामदैवत मालोबा -बालोबा यांची गावातून दुपारी एकच्या दरम्यान पालखी मिरवणूक निघते. पाच तळी म्हणजे पाच मानाच्या ठिकाणी ही पालखी मिरवणूक काढली जाते. यामध्ये अनेक भाविक- भक्त गुलालाची उधळण करीत सर्व थरांतील व सर्व समाजातील बांधव व विशेषतः मुस्लिम बांधव एकत्रितपणे "सर्वधर्म समभाव "या वृत्तीने आनंदाने सहभागी होतात. त्याचप्रमाणे हौसे-नवसे,गवसे या इतरांच्या करमणूकीसाठी बेंजोपार्टी, गायन पार्टी तसेच तळीराम व आंबट शौकीनासाठी तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालखी दर्शनासाठी महिलांची लक्षणीय मांदियाळी दिसून आली. हे विशेष..!

यात्रोत्सवात  डिझायनिंग ज्वेलरी, रहाटगाडगे, विविध खेळण्यांची दुकाने, आईस्क्रीम पार्लर, गोडधोड पदार्थांची हाॅटेल्स, कापड दुकाने,व विविध प्रकारचे व्यावसायिक दुकाने मोठ्या प्रमाणावर दिसून आले. यात्रेच्या ठिकाणी दुतर्फा गर्दी आढळून आली.
 
या यात्रोत्सवात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सहकार्य केले. किरकोळ वाद सोडता यात्रेला कुठल्याही प्रकारचे गालबोट ग्रामस्थांनी लागू दीले नाही. हे विशेष..!
भारत स्वातंत्र्यानंतर पहिल्या वेळेस यात्रोत्सव ज्याच्या त्याच्या सोयीनुसार रात्रभर साजरा होताना दिसून आले. 

या कार्यक्रमासाठी माननीय पंचायत समिती सदस्य व्हि डी काळे,मा.सरपंच व सोसायटीचे मा.चेअरमन,सदस्य यांसह स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. यात्रा कमेटी ,सरपंच व चेअरमन व सदस्य यांनी यात्रोत्सवात  सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून धन्यवाद दिले.
close