डोंबिवली । प्रतिनिधी :-
डोंबिवली पुर्व प्राथमिक विद्यामंदिर डोंबिवली(पूर्व) च्या मुख्याध्यापिका मा. सौ.आसावरी अशोक मुळे यांचा सेवानिवृत्ती सोहळा 31 जानेवारी 2022 रोजी पार पडला.त्या कार्यक्रमात मा. श्री.सुरेशभाऊ यशवंतराव कुशाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्या प्रसंगी मुख्याध्यापिकांनी आपल्या भाषणात शाळेच्या उत्कर्षात त्यांची कशी मदत झाली ते सांगितले. त्यांनी स्थापन केलेल्या श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून शाळेला आर्थिक मदत केली.स्वातंत्र्यदिन प्रजासत्ताकदिन याचे औचित्य साधून शाळेत मोफत गणवेष वाटप, शालेय वस्तूंचे वाटप हे उपक्रम राबवले.
वेळोवेळी मागितलेली मदत त्यांनी शाळेला केली. त्यामुळे शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांची मदत झाली असे म्हणत त्यांनी मा.श्री.सुरेशभाऊ यशवंतराव कुशाळकर यांचे आभार मानले आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

