shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर प्रशासकीय भवनाबाहेरच स्टॅम्पचा होतोय सर्रास काळा बाजार,..! मुद्रांक विभागात तक्रारी असूनही मुद्दाम होतेय डोळेझाक..!!


शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क:-
इंदापूर  :- इंदापूर येथील तहसिलदार कार्यालयाबाहेर अनेक स्टॅम्पव्हेंडर स्टॅम्प विक्रीसाठी बसलेले असतात. जवळपास इंदापूर तालुक्यातील एकूण १४२  गावांतील लोक कामानिमित्त कचेरीत येत असतात. ब-याचदा नोटरीपासून ते अगदी बॅंक कर्जाकामी लोकांना स्टॅम्प पेपर लागतोच. याचाच फायदा तहसील कार्यालयाबाहेरील स्टॅम्पव्हेंडर उचलताना दिसतो. स्टॅम्पव्हेंडर १०० चा स्टॅम्प १२० ते १५० पर्यंत तर  ५०० रू चा स्टॅम्प ६०० ते ७०० रूपयांपर्यंत विकतानाचे चित्र इंदापूर तहसील कार्यालयाबाहेर सर्रास पाहायला मिळते.  

मुद्रांक व शुल्क  विभागाच्या कायद्याने सुट्टीच्या  दिवशी स्टॅम्पच्या विक्रीस बंदी  असताना देखील इंदापूर तहसील कार्यालयाच्या बाहेर सर्रास स्टॅम्प विक्री केली जात आहे. भगवान कोळेकर स्टॅम्पव्हेंडर यांनी स्वतःचे स्टॅम्पव्हेंडरचे लायसन्स कचेरीतील गाळ्यात कोणाकडेही चालवायला देऊन व विक्री करणारास एकदाच सर्व स्टॅम्प सही करून देऊन सदर स्टॅम्प मनाला वाटेल तितक्या रकमेस विकण्यास सांगत आहेत. सदर स्टॅम्पव्हेंडरची तक्रार अनेक लोकांनी मे. दुय्यम निबंधकसो यांचेकडे केली. तसेच पुणे येथील ग्रामीण नोंदणी व मुद्रांक विभाग, स्टॅम्पव्हेंडरचे मा.जिल्हाधिकारीसो यांचेकडेदेखील केली. परंतु अजूनपर्यंत सदर स्टॅम्पव्हेंडरवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

जर यावर सदर मिलीभगत अधिकारी कारवाई करणार नसतील तर नागरिक व सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनात सहभागी होऊन ढोल बजाओ आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. तरी संबंधित प्रशासनाने उचित कारवाई तातडीने करावी अशी विनंती नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
close