प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २ / नगर येथील सावेडी उपनगरातील निर्मलनगर भागातील युवकांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने बर्फामध्ये शिवलिंग साकारून अनोख्या पद्धतीने महाशिवरात्र साजरी केली .
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीच्या निमित्ताने निर्मलनगर येथील सेवार्थ प्रतिष्ठानच्या युवकांनी अध्यक्ष वैभव पोकळे यांच्या मार्गदर्शनाने आगळी वेगळी संकल्पना घेवून बर्फामध्ये शिवलिंग साकारल्याने अनेक शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला .
प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव पोकळे यांनी सांगितले की , दरवर्षी प्रतिष्ठाण मार्फत सामाजिक उपक्रम राबविले जातात . आज महाशिव रात्रीच्या निमित्ताने बर्फात शिवलिंग साकारले . अनेक शिवभक्तांनी येवून दर्शन घेतले . अनेक महिला व पुरुषांनी या उत्सवासाठी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला . यावेळी सेवार्थ प्रतिष्ठाण मार्फत नागरिकांना केळी आणि खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला.उपाध्यक्ष शेखर काते व सचिव अक्षय गांगर्डे यांनीही मोलाचे सहकार्य केले .
महाशिवरात्रीच्या आयोजना साठी सेवार्थ प्रतिष्ठाणचे सभासद रमेश जाधव,दिपक साबळे,अजय औटी ,सुमित हसिजा ,कृष्णा वाघमारे ,रमेश बावडकर,प्रकाश बोराटे ,अमोल सोनार,राहुल काते,अनिल करांडे , सिद्दार्थ ठोंबरे ,
परेश अमृतवाल ,प्रशांत सराफ, सागर गोरे, अजय ठोंबरे आदि युवकांनी परिश्रम घेतले .

