shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य,..! राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडे मारुन निषेध..!

पूर्णा । वार्ताहर :-                                                  
रामदास स्वामी नसते तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते त्यांना कोणी विचारले नसते असे विधान करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल मानवत येथे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडे मारुन जाहीर निषेध व्यक्त करत मानवत तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने  राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी जाऊन तात्काळ माफी मागावी अन्यथा होणार्‍या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मानवत तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती रामनाथ  कोविंद यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

                

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे समस्त बहुजन समाजाचे प्रेरणास्थान रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामी नसते तर घडले नसते. त्यांना कोणी विचारले असते असे विधान करत त्यांचा एकेरी उल्लेख करून अपमान केला आहे. त्यामुळे संपूर्ण शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत. कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे इतिहासाला धरून नाही तसेच ते विधान महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणास बिघडवणारे आहे.

राज्यपाल पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीने असे विधान करणे लज्जास्पद आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मानवत तालुका संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध व्यक्त केला, व राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी जाऊन तात्काळ माफी मागावी अन्यथा होणार्‍या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपतीना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

निवेदनावर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष गोविंद घाडगे, माऊली चांगभले, कैलास दळवे, मोहन महिपाल, गजानन होगे, सुनील कापसे, सुरज काकडे, कृष्णा शिंदे, माऊली शिंदे, माधव शिंदे, मुकींद शिंदे, रामप्रसाद काळे,अनिल काळे, बबलू काळे,परमेश्वर कदम यांच्या स्वाक्षर्या आहेत.

मानवत मध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यपाल कोशारी यांना जोडे मारून निषेध केला
close