shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामोडे येथील दत्तनगर येथे होळी उत्साहात साजरी..!

नगर । प्रतिनिधी : 
सामोडे येथील दत्तनगर येथील होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर संध्याकाळी पुरोहित नंदकुमार पाठक यांनी मंत्र म्हणत पत्रकार व साईबाबा पाणी वाटप संस्थाचे चेअरमन दिलीप घरटे यांच्या शुभ हस्ते होळी प्रजोलीत केली. यावेळी दिलीप घरटे व ग्रामस्थ यांनी गावात सुख शांती लाभो भरपूर पाऊस पडु दे कोरोनाची कायमस्वरूपी होळी होऊ दे अशी प्रार्थना केली. 

यावेळी दिलीप घरटे, पोपट भदाणे, अरूण भदाणे, सुरेश भदाणे, रविंद्र मोरे, पंडित काका सोनवणे, आण्णा बाळा भदाणे, उमेश भदाणे, लक्ष्मण मोरे, दिनेश भदाणे, पुरोहित पाठक दादा, आंनदा शिंदे, रामकृष्ण शिंदे, वसंत भदाणे, त्र्यंबक भदाणे, निलंकठ भदाणे, दत्तात्रय शिंदे, सोनु बेडसे, राजेंद्र शिंदे दत्तनगर येथील ग्रामस्थ तरूण मंडळी बालगोपाल महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते. गावातील महिलांनी नैवेद्य होळीला दिला आणि आशिर्वाद घेतला आणि प्रत्येक बंधु भगिनी यांनी सुख शांती लाभो यासाठी प्रार्थना केली.
close