shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पूर्णा शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असतानाही अवैध धंद्यांना अभय...!

पूर्णा । प्रतिनिधी :-शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे. तरीही शहरात काही मोक्याच्या ठिकाणी लपून छपून मटका चालत आहे. तसेच अवैध गुटखा विक्री, अवैध रेतीचा उपसा असे अवैध धंदे उपविभागीय पोलीस अधिकारी असूनही " चोरी चोरी छुपके छुपके"चालत असून त्यास पोलीस अधिकारी अभय देत असल्याचे जनता सांगत आहेत. शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय समोर, आंबेडकर चौक, जुना मोंढा व अन्य ठिकाणी चोरुन लपून मुंबई कल्याण वरळी मटका घेतला जात आहे. 


तसेच तालुक्यातील मोठ्या नदीतून अवैध रेती उपसून तीची विक्री केली जात आहे. गाढवावरून देखील अवैध रेती उपसा चालू आहे. या सर्व अवैध धंद्यांना पोलीस कर्मचारी जाणिवपूर्वक अभय देवून आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत. जवळपास २० ठिकाणाहून च्या वाळू उपसा प्रकराचा हप्ता एक जमादार वसूल करीत आहे. तो कोण?  असा सवाल नागरिक करीत आहेत. येथे उपविभागीय पोलीस अधिकारी असूनही त्यांचा कोणताच वचक राहीला नसल्याने अवैध धंदे जोर धरीत आहेत. पोलीस अधिकारी यांच्याकडून अवैध धंदे चालवणारांना सदर धंदे उघड न करता चोरुन चालू द्या, असे फर्मान सोडले की काय! लोक सवाल उठवित आहेत. सदरील लपून छपून चालवल्या जाणाऱ्या अवैध धंद्यांकडे परभणीचे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक लक्ष देतील काय?  असा प्रश्न जनता करीत आहे.
close