सोनपेठ । ( प्रतिनिधी ) :
राष्ट्रीय सेवा योजना ही खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या अंगी सेवाकार्य रुजवते , भविष्यातील परिवर्तनासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक काळामध्ये रा.से.योजनेत सहभाग घेतला पाहिजे असे मत स.पो.नि.संदिप बोरगावकर यांनी रा.से.यो.शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डिगोळ येथे व्यक्त केले.
कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष शिबिर तालुक्यातील डिघोळ येथे आयोजित करण्यात आले आहे. या विशेष शिबिराचे उद्घाटन दि.२६ शनिवार रोजी संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष परमेश्वर कदम, प्रमुख पाहुणे सरपंच सौ.आशाताई शिंगाडे उपसरपंच अजयकुमार देशमुख, संतोष सावंत, गणेश पाटील,विजयकुमार देशमुख, किरण स्वामी, महादेव गिरे आदी उपस्थितीत होते.
पुढे बोलताना बोरकर म्हणाले की, शिबिराच्या काळात विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी शिकले पाहिजे. स्वतःला जर आपण परिपूर्ण बनवले तर यश आपल्या हाती येते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. बापूराव आंधळे तर आभार प्रा. गोविंद वाकणकर यांनी मानले.
याप्रसंगी विद्यार्थी ,पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

