तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार उज्वल भवितव्यासाठी दिशादर्शक - अजय हिवाळे
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २१ / छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे विचार आजही समाजाला एकविसाव्या शतकात देखील तेवढेच प्रेरणादायी आहेत. आजच्या तरुण पिढीला उज्वल भवितव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अजय हिवाळे यांनी केले .
शिवजयंती निमित्त नगर येथील सावेडी परिसरातील निर्मलनगर मित्र मंडळाच्या माता भगिनी व युवकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. मुलांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती .
यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सर्व परिसर यावेळी दणाणून गेला होता.
यावेळी संभाजी गवळी, इरफान शेख , ज्ञानदेव काळे, हिवाळे अंकल,चंद्रकांत वायकर, राहुल सांगळे , सुमित भोगे ,संतोष काळे, सुशांत भिंगारदिवे, समाधान दिक्षित, प्रथमेश कोल्हे ,जावेद इनामदार,साजिद इनामदार , हर्षल झावरे , संतोष भराट , इरफान शेख, प्रथमेश गटणे, सचिन अकोलकर,दिलीप ठाकूर , अभिषेक खामकर तसेच मेरी खंडागळे ,रंजना काळे , पुष्पा वायकर , भराट मावशी ,वर्षा गवळी , ज्योती पुरी , सोनाली निमसे, शरयु काळे,आहिरे मॅडम, गहिले मॅडम आदी महिला व नागरिक व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सागर गवळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व जाती धर्माच्या समाज घटकांना एका समान धाग्यात गुंफण्याच काम केलं. रयतेसाठी कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे हेच विचार समाजाला आजही प्रेरणादायी असून तरुण पिढीने या विचारांचे अनुकरण मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.

