पूर्णा । प्रतिनिधी:- पूर्णा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पूर्णा ते हयात नगर रोडवरील बरबडी येथे दिनांक 21 मार्च सायंकाळी एका 19 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी पूर्णा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या बरोबर येथे दिनांक 21 मार्च सोमवारी सायंकाळी चार तीस वाजता गावातील एकोणीस वर्षे युवकास आकाश तातेराव कांबळे 19 हा गावालगत असलेल्या एका विहिरीजवळ होण्यासाठी गेला होता परंतु त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे तो पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी प्राथमिक स्वरूपात पूर्ण पोलिसांना दिलेल्या खबरी मुळे घटनास्थळाला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश महाले यांनी भेट देऊन परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने पाणी उपसून काढले व सकाळी त्याचा मृतदेह हाती लागला असून याप्रकरणी पूर्णा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश झाले हे करत आहेत.

