महिला अधिकाऱ्यांची केलेली बदनामी आम्ही कधीही खपवून घेणार नाही -अनिताताई खरात
इंदापूर प्रतिनिधी: दि . १८ मार्च रोजी एक पत्रक व्हाट्सअप फेसबुक वर फिरत होते त्यात इंदापूर मधील ज्यांची ओळख कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सिंघम लेडी अशी आहे त्या पोलीस कॉन्स्टेबल माधुरी लडकत यांच्यावरती पत्रकात नाव लिहून आरोप केले आहेत असे एखाद्या महिले वरती नाव लिहून आरोप करणे तिची बदनामी करणे चुकीचे आहे असे तेजपृथ्वी ग्रूपच्या अनिताताई खरात यांनी सांगितले व त्या पुढे म्हणाल्या आम्ही असे प्रकार खपवून घेणार नाही.
ज्यांनी आरोप केले त्यांना गावातून काही त्रास होत असेल तर त्यांना न्याय मिळावा ही आमची ही अपेक्षा आहे त्यांनी त्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा.परंतु गावातील किंवा शेजारील वादासाठी शासकीय अधिकार्यांचे नाव घेऊन बदनाम करू नये जर एखाद्या गुन्ह्यात केस आल्यानंतर पोलीस स्टेशन मधील एखाद्या अधिकाऱ्यांमार्फत यांची चौकशी करणे अधिकार्याचे काम आहे आणि चौकशी केली म्हणून जर अधिकाऱ्याची तुम्ही बदनामी करत असाल तर ते चुकीचे आहे
सध्या इंदापूर पोलीस स्टेशन अतिशय चांगले काम करत आहे आणि अशात वैयक्तिक कारणासाठी अधिकारी वर्गाला बदनाम करू नये. आपल्या वैयक्तिक वादासाठी एखाद्या महिलेची नाव घेऊन किंवा पोलिस अधिकाऱ्यांचे नाव घेऊन प्रसिद्धीसाठी कोणीही काहीही असले प्रकार करू नयेत माधुरी लडकत यांचे नाव घेऊन गरज नसताना रीतसर चौकशी केली म्हणून जर पुन्हा सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी त्यांची बदनामी करण्याचा कोणीही प्रयत्न केला तर तेजपृथ्वी ग्रुप जशास तसे उत्तर देईल याची नोंद घ्यावी. तसेच कोणत्या अधिकाऱ्याची बदनामी सोशल मीडियावर करू नये ही विनंती.
आणि मला वाटते मुजावर साहेब ,धनवे साहेब आल्या पासून इंदापूर मद्ये बरेच गुन्हे व अवैध धंद्यांना आळा बसला आहे , तसेच माधुरी लडकत , अपर्णा जाधव यांच्या माध्यमातून कॉलेजच्या मुलींना रोडरोमिओ पासून होणारा त्रास खूप प्रमाणात कमी झाला आहे याचीही आरोप करणाऱ्यांनी दखल घ्यावी आरोपासाठी किंवा स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी पोलिस प्रशासनाला बदनाम करु नये, ही विनंति.
तसेच माझी प्रशासनाला ही विनंती आहे की आपण ज्यांनी आरोप केले त्यांचे ही काही प्रोब्लेम असतील तर ते नियमाप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न करावा असे सौ .
अनीताताई खरात -संस्थापक अध्यक्ष तेजपृथ्वी ग्रुप यांनी म्हटले आहे.

