shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजाचा दुसरा जागतिक महिला दिन -२०२२ मोठ्या उत्साहाने पुण्यात होतोय साजरा..!

चला समाज जोडू या ! चला समाज घडू या..!!

अखिल वडार समाज बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, पुणे आयोजित.

पुणे । प्रतिनिधी :-
 ८ मार्च जागतिक महिला दिन निमित्त- वडार नारी सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक कला महोत्सव - २०२२, रविवार दिनांक १३ मार्च २०२२ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सांस्कृतिक भवन, मालधक्का चौक, पुणे स्टेशन जवळ, पुणे - ४११०१ येथे होणार आहे.

.



या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सौ. भारतीताई कुराडे,  निवृत्त पोलिस उपायुक्त पुणे, विशेष उपस्थिती म्हणून मा. श्री. नागेशजी चौगुले, सहायक आयुक्त - समाज कल्याण, सोलापूर, स्वागताध्यक्षा मा. सौ. संगिताताई धोत्रे माजी नगराध्यक्षा- तळेगाव दाभाडे नगरपरिषद, आणि कार्यक्रम अध्यक्षा मा. सौ. सुनिताताई जाधव - दाते आदर्श शिक्षिका सोलापूर हया आहेत.


या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका पुणे मनपा. सौ. शारदाताई ओरसे, मा. सौ. निताताई मंजाळकर, मा. सौ. सरिताताई वडीयार, मा. सौ. गिरिजाताई इरकल - माने, मा. सुनिता ताई साळुंके, मा. सौ. सुनंदाताई देवकर, मा. सौ. संगिताताई पवार, स्विकृत सदस्या - मा. कु. अपर्णाताई कुराडे, सामाजिक कार्यकर्त्या मा. श्रीमती मंगलाताई पवार, मा. सौ. सुजाताताई इरकल, कु. अंजलीताई ओरसे, सौ. अनिताताई पवार, सौ. सोनालीताई डोंगरे, सौ. सुनिताताई जाधव, सौ. मानसीताई वडार, सौ. सुलोचनाताई विटकर, सौ. स्वातीताई कुसाळकर, सौ. करुणाताई रणशुर, सौ. शोभाताई माने, सौ. संगिताताई जाधव, श्रीमती पुजाताई भातकर, सौ. सीमाताई गायकवाड, सविताताई शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.

विशेष निमंत्रित म्हणून सौ. अनुराधाताई मुधोळकर, सौ. हेमाताई शिंदे, सौ. पल्लवीताई बंडगर, कु. संगिताताई पवार हे उपस्थित राहणार आहेत. आणि कु. पुजाताई आळकुटे, मा. प्रा. श्री. दिलीप जाधव, सौ. ललिताताई धनवटे, सौ. जयश्रीताई अलकुंटे, सौ सुनिता जाधव हे वक्ते समाज प्रबोधन आणि महिला सबलकरणासाठी व्याख्याने होणार आहेत.

तसेच दुसरे सत्रासाठी कार्यक्रम अध्यक्ष श्री. शामराव पवार, विशेष उपस्थिती म्हणून श्री. शिवरुद्र स्वामी, बेंगलोर आणि श्री. नरसिंह गुंजी हैद्राबाद आणि स्वागत अध्यक्ष मा. श्री. टी. एस. चव्हाण आणि विशेष निमंत्रित म्हणून मा. श्री. सुरेश धोत्रे, मा. श्री. मुकुंददादा पवार, मा. श्री. किशोर विटकर, मा. श्री. दयानंद इरकल, मा. श्री. राकेश विटकर आणि पाहुणे म्हणून मा. प्रा. डॉ. श्री. महादेव देशमुख, मा. प्रा. डॉ. श्री. अशोक बंडगर मा. प्रा. श्री. शशिकांत जाधव, मा. श्री. रमेश पवार, मा. श्री. कोळप्पा धोत्रे, मा. श्री. राजेश ननावरे, मा. श्री. वरद राजलू , मा. श्री. नरसिंगराव बोडासु इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात नृत्य अविष्कार, मिमिक्री, नक्कला, विनोद, गायन, वाद्य वाजविणे, वडार गीत, कविता सादरीकरण, व्यक्तीरेखा सादरीकरण, एक पात्र नाटक, इत्यादी सांस्कृतिक महोत्सव मध्ये  समावेश आहे. तसेच कलाकार, क्रिडा, नृत्य अविष्कार, समाज कार्य, उच्च शिक्षित आणि शासकीय अधिकारी शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटविले अशा बंधू आणि भगिनींना समाज रत्न पुरस्कार, समान गौरव पुरस्कार, वडार प्रेरणा कन्या रत्न पुरस्कार, कला - क्रिडा रत्न पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार, आदर्श माता पिता पुरस्कार, विशेष गुणवंत पुरस्कार, विशेष सत्कार मुर्ती इत्यादी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमात मा. माधुरीताई चव्हाण, श्री. दिपेश पिटेकर, श्री. शांताराम मनवरे, श्री. अभिमान विटकर, कु. सविता चौगुले  याचे सूत्रसंचालन लाभणार आहेत.
 
या संयोजन श्री. हरिष बंडीवडार, श्री. मनोहर मुधोळकर, श्री. रमेश शिंदे, श्री. अशोक पवार, श्री. रमेश जेठे, श्री. लक्ष्मण पवार, श्री. सचिन चव्हाण, श्री. मच्छिंद्र धनवटे, श्री. श्याम विटकर, श्री. संदिप शिंदे इत्यादी यांनी संयोजन केले आहे. आणि निमंत्रक - श्री. अशोक देवकर, श्री. हरिभाऊ कुसाळकर, श्री. जनार्दन कुसाळे, श्री. अशोक इटकर, श्री. विजय कुराडे, कु. संध्या मोरे, श्री. रविंद्र माने, श्री. गोपाळ जाधव, श्री. श्रीरंग नलावडे, श्री. रामू धोत्रे, श्री. लक्ष्मण चौगुले, श्री. आप्पाराव इटेकर कु. सुनिता गाडीवडार, कु. पुजा गाडीवडार इत्यादी आहेत

ही संस्था वडार समाजाचे सलग ७ वर्षे यशस्वी विविध उपक्रम राबवत आहे. वडार वधु - वर  व पालक परिचय राज्यस्तरीय महामेळावा, जागतिक महिला दिन, अखिल भारतीय वडार समाज बोली भाषा साहित्य संमेलनास आणि गोलमेज परिषद यास विशेष सहकार्य असे अनेक उपक्रम राबविले आहेत. अशी माहिती संयोजन समितीचे प्रमुख श्री. अशोक पवार यांनी माहिती दिली आहेे.


close