shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा समन्वयक सन्माननीय योगेश देशमुख सर यांची हिंद सेवा मंडळ अहमदनगर शैक्षणिक संस्थेत सहाय्यक सचिव पदी निवड

राहुरी । तालुका प्रतिनिधी (जावेद शेख)दि. ११-३-२०२२ :

   कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा समन्वयक सन्माननीय योगेशजी देशमुख सर यांची हिंद सेवा मंडळ अहमदनगर यानामांकित शैक्षणिक संस्थेत सहाय्यक सचिव पदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर शिक्षक भारती व अकोले तालुका शिक्षक भारती यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती अकोले तालुकाध्यक्ष संपत वाळके , कार्याध्यक्ष गणपत धुमाळ , माध्यमिक विभागाचे अकोले तालुका अध्यक्ष संजय पवार कार्याध्यक्ष दत्तात्रय घुले मार्गदर्शक पंडित देशमुख प्रमोद जोशी, संदीप महाडदेव योगेश उगले शिक्षक वृंद उपस्थित होते.
close