shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गाडीत बसून दीपक जाधव म्हणतात ठरलं तीन तारखेला फिक्स.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गाडीत बसून दीपक जाधव म्हणतात ठरलं तीन तारखेला फिक्स.
इंदापूर प्रतिनिधी: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दीपक जाधव या युवा नेतृत्वाला राष्ट्रवादी पक्षात आणण्यात यश आल्याचे दिसत आहे. आज दिनांक ३१ मार्च रोजी शहरात राज्यमंत्री भरणे यांच्या गाडीत बसून फिरताना दिसले. तसेच नगरपरिषद येथील कार्यक्रमात भरणे यांच्याबरोबर कार्यक्रमास हजेरी लावली. सदर घडामोडीतून असे दिसते की, दीपक जाधव हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत बराच काळ राजकारणामध्ये  होते. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी ही निवडणूक लढवली होती. एक प्रमुख युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु अशा युवा नेतृत्वाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खेचून आणण्याचे राज्यमंत्री भरणे यांना यश आल्याचे दिसत आहे . त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्यमंत्री यांच्या गाडीत त्यांच्या जवळ बसून तीन तारीख फिक्स असा शब्द उच्चारला यावरून असे दिसते की येत्या तीन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करतील.
close