shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हेमंत मुसरीफ यांच्या छान कविता...!

चूक भूल .

सगळीकडे एक हूल
पी एम  झाले राहूल
पी एम नाही एम पी
ही शब्दांची चूकभूल

सगळीकडे एक हूल
धरले  माल्या  मेहूल
धरले  नाही   दिसले
ही शब्दांची चूकभूल

लोड शेडींग होणे ना
लगेचं ती  बत्ती  गूल
बळीराजा हसू  लागे
ही शब्दांची चूकभूल

प्रेटोल डिझेल  स्वस्त
तीस रुपै  टाकी फुल
गॅस  सिलेंडर  फुकट
ही  शब्दांची चूकभूल

पर्यावरण  जपे  सारे
कुठेही न कचराधूळ
स्वच्छता आंत बाहेर
ही शब्दांची चूकभूल

महिला सुरक्षित  इथे
सुटले आता चूलमूल
बलात्कार शून्य झाले
ही शब्दांची चूकभूल

फिदीफिदी हसायचे
करून  एप्रिल  फूल
क्षणभर  का  होईना
बुवा झाली दांडीगूल


2)
फुल्ल फूल ..

अच्छेदिन आलेआले
नाचतो आम्ही  भोले
पेट्रोल  गाठते शंभरी
सुखात भिजून ओले

लाईट बील   मोठाले
चुपचाप  सारे  भरले
वीजमाफी आश्वासन
पाणी मध्यात  जिरले

हमीभावाच्या आशेने
कांदे   टोमॅटो  सडले
नवीन कर्जचं मिळेना
रे  जुने सगळे  फेडले

आरक्षण भिजे कोर्टा
भरधाव घोडे  अडले
झाले  झाले  म्हणता
किती  वेळा  रखडले

व्यवहार सारे  अडले
त्या कोरोनाने पिडले
पुन्हा तो लाॅकडाऊन
हे  अंगवळणी  पडले

मुर्ख  बनवा आम्हांस
डोके सदैव  बिघडले
एप्रिल फुल  कशाला
कायम जातो  रगडले


3)
शेतकरी फूल ..

ढग  गेले फसवून 
बळीराजा रडवून 
दुबारपेरणी केली 
पीकेगेली करपून 

बियाणे बोगस ती
पुन्हा गेलो फसून
तिबार पेरं करून 
कर्ज  घेतो ओढून 

कर्जमाफ घोषणा  
हवेत गेली विरून
बँकेचे  अधिकारी 
बसले  कसे  हटून 

हमी भावाची हमी
बोलले  सारे  रेटून 
साठेबाज ऐटबाज 
दुकान  बसे थाटून

विमा पुन्हा नापास
जोडे  गेले  झिझून 
घरी आलो रिकामा
देणे  सर्वां  लूटवून

जेवढे  होते हातात
पोशींदा देई  वाटून 
जगाचे भरतो  पोटे
लेकरा आणू कुठून


4)
फूल परत .

जातो  जातो म्हणत
कोरोना येतोयं परत
एप्रिल  फूल  बनलो
आम्ही  मुर्खचं  परत

कुणी काही  सांगता
आम्ही राहतो फसत
ठाण   मांडून बसला
करोनाखुशीत हसत

कानीकपाळीओरडा
राहतो नियम  मोडत
वेडे पणाची  हद्द  ही
रे चाळे  नाही सोडत

लाॅक  डाऊन  रिटर्न
चाललो उलटे पळत
वेड्या वरती  शहाणे
कडक ठेवती पाळत

एप्रिल फूल व्हायला
महिना नाही रे  पुरत
जन्म जात गाढव मी
चुकतोचं परत  परत

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996.
 www.kavyakusum.com

close