पडस्थळ येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता समारंभावेळी तेजपृथ्वी ग्रूप तर्फे कल्याण पवार यांचा सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी: २६ मार्च ते ३० मार्च २०२२ या कालावधीत पडस्थळ येथे कल्याण पवार यांनी अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत ग्रंथ पारायनाचे आयोजन केले होते. यासाठी पांडुरंग तात्या मारकड मित्र परिवारने सहकार्य केले असून या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील नामवंत अशा कीर्तनकारांचे,गायक व वादक मंडळींचे, वेगवेगळ्या महाराजांचे दररोज संध्याकाळी कीर्तन, प्रवचन ठेवण्यात आले होते. गावातील व परिसरातील येणाऱ्या सर्व लोकांना ५ दिवस अन्नदान करण्यात आले. या सद्कार्यासाठी कल्याण पवार यांना पांडुरंग मारकड व महेंद्र रेडके यांनीही मोलाचे सहकार्य केले .
शिवाजी महाराजांचां आदर्श डोळ्यासमोर ठेवून पवार हे जनतेसाठी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना ज्ञानदान व अन्नदान करत आहेत आणि हे सर्व अतिशय सुंदर अशा नियोजनबद्ध पद्धतीने करत असल्याकारणाने
तेजपृथ्वी ग्रुप तर्फे आज काल्याच्या कीर्तनात सप्ताहाच्या समारोपा वेळी कल्याण पवार यांना छत्रपती शिवाजी ओमहाराजांची प्रतिमा व सन्मानचिन्ह देऊन पवार यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी नियोजन समितीचे महेंद्र रेडके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उप सभापती पांडुरंग मारकड, संतचरणराज ह भ प बाळकृष्ण वसंतगडकर, तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात, मृदंग वादक राम महाराज काजळे, सुभाष बोंगाणे, नानासाहेब खरात,परशुराम रेडके , गणेश शिंगाडे, हनुमंत यमगर व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

