देवळाली प्रवरा - दि. १४ मार्च
शेतकऱ्यांच्या कृषि पंपाला पूर्णवेळ विना खंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने देवळाली प्रवरा येथील उप अभियंता देहरकर साहेब यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह निवेदन दिले.
या प्रसंगी सुनील कदम, शिवाजी मुसमाडे, विजय कुमावत, संतोष चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, आप्पासाहेब चव्हाण, भाऊसाहेब ढुस, अमोल गडाख, बापूराव दिघे, संदीप भलसिंग, आशा माळी, तमिजा शेख आदींसह महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
महावितरण ला प्रहारचे वतीने दिलेल्या निवेदनामध्ये आप्पासाहेब ढुस यांनी म्हंटले आहे की, विजेच्या लपंडावाणे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकरी बिल भरीत असताना महावितरणने पूर्ण दाबाने व पूर्ण वेळ वीज उपलब्ध करून द्यावी. अन्यथा शेतकर्यांच्या शेतीच्या नुकसानिस महावितरण जबाबदार धरून प्रहार स्टाईल आंदोलन केले जाईल. त्याच पद्धतीने दुसऱ्या निवेदनात वाढीव बिलाचा प्रश्न उपस्थित केला आहे, सध्या महावितरण कडून जनतेला वाढीव व चुकीची बिले देऊन त्यांची वीज तोडली जात आहे त्या नागरिकांचे बिल दुरुस्त करून त्यांची वीज सुरळीत करून द्यावी तसेच विजेच्या लोम्बलेल्या तारा दुरुस्ती करून अपघात टाळावे आदी मागण्या निवेदनात प्रहार चे वतीने करणेत आल्या आहेत.
या प्रसंगी महावितरण चे उप अभियंता देहरकर साहेब यांनी सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.

