shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आपले घर परिसर स्वच्छ ठेवाल्यास शहर स्वच्छ राहील- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज नगरपंचायत अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण 2020 अंतर्गत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा पंधरवडा  लोकसहभागातून दिनांक 14- 3- 2020 रोजी 28- 3- 2020 पर्यंत स्वच्छता राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बीड जिल्हा अधिकारी राधाबिनोद शर्मा हे होते.  


या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की स्वच्छ शहर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरा पासुन स्वच्छतेची सुरवात करावी आपले घर आपला परिसर व आपले शहर स्वच्छ ठेवावे या कार्यक्रमला अध्यक्ष म्हणून सुरेश तात्या पाटील नगर अध्यक्षा सिताताई बनसोड ,जनविकासचे नेते हरूनभाई इनामदार ,पशुतिनाथ दांगट,केज तहरीलदार दुधाजी मेडके ,आरोग्य अधिकारी आठवले , सचिन देशपांडे ,किसन कदम नगरसेवक न.प.कर्मचारी पत्रकार ,रोटरी कल्ब ,युवा मंडळ ,बचत गटाचे अध्यक्ष ,शहरातील व्यापारी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते, 

जिल्हाधिकारी साहेब यांच्या हास्ते डसबिनचे उद्घटन करण्यात आहे केज शहरातील प्रत्येक घरात करचा ठेवण्यासाठी डसबिनचे वाटप करण्यात येणार आहेत ,

आज अभियानाच्या पहिल्या दिवशी नगरपंचायत ते मंगळवार पेठ रोडवर स्वतः हातात झाडू घेऊन नगर अध्यक्षा सिताताई बनसोड व जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हरूनभाई इनामदार यांच्या सह न.प. सभापतीनगरसेवक ,न.प. कर्मचारी यांनी स्वच्छ अभियानाची सुरवात केली आहे ,


.........................................................

या कार्यक्रम जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हरूनभाई इनामदार यांनी येणाऱ्या काळात केज शहरातील विकास कामासह व विविध योजनाची माहिती बीड जिल्हा अधिकारी श्री. राधाबिनोद शर्मा सह केज शहरातील नागरिकांना दिली आहे ,
close