shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धारूर तालुक्यातील मैंदवाडीच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली- रमेशराव आडसकर..!!



प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत मैंदवाडी सारख्या खेड्यातुनही विद्यार्थी एम.बी.बी.एस.,पोलीस,व नेट सेट होतात ही बाब आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामिण भागातील समस्येला तोंड देवुन व आर्थिक परिस्थितीवर मात करुन या गांवाने आपल्या यशाची पताका फडकवली आहे असे प्रतिपादन भाजपा नेते रमेशराव आडसकर यांनी केले.

ते सत्कार सोहळ्यात बोलत होते.या वेळी मैंदवाडीचे सरपंच  तथा कृषी उत्पन्न बाजार समिती धारुरचे संचालक सचिन दादा मैंद उपस्थित होते.

 
दि.14/3/2022 रोजी मौजे मैंदवाडी येथे ग्रामपंचायत मैंदवाडीच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थी ज्यांनी विविधक्षेत्रा मध्ये चौफेर यशाची पताका उंचावण्याचे काम करून गावाचा नाव लौकीक केला ज्यामध्ये कु. प्रतिक्षा विजय आंधळे हीने एम.बी.बी.एस. साठी निवड, चि.दादू बबन मैंद यांनी केमेस्ट्री विषया मधे  नेट परिक्षा उत्तीर्ण केल्यामुळे, त्याचप्रमाणे चि.नितीन वढणे पोलीस म्हणून नियुक्ती, त्याचबरोबर चि. वढणे यांनी रेल्वे पोलीस म्हणून निवड, चि. विठठल शामू मैंद यांनी लॉ मध्ये नेट परिक्षा उत्तीर्ण झाल्याने माजलगाव मतदार संघाचे भाजपचे नेते श्री. रमेशरावजी आडसकर यांच्याहस्ते सत्कार  करण्यात आले. 

यावेळी  मा. सचीन दादा मैंद सरपंच तथा संचालक कृषी उत्पन्न बाजारसमिती धारूर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वञ अभिनंदन व कौतुक होत आहे.
close