शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. बुधवार दिनांक १६ मार्च २०२२
रंगकर्मी प्रतिष्ठान कलाकारांचा मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते सत्कार..!!
अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात मनसे नेते बाळा नांदगावकर जिल्ह्यात मनसे पदाधिकार्यांच्या मेळाव्यासाठी आले होते. यावेळी ६० वी राज्यनाट्य स्पर्धेत प्राथमिक फेरीत प्रथम व अंतिम फेरीसाठी निवड झालेले वात्सल्य प्रतिष्ठाणचे ज्याचा त्याचा प्रश्न या नाट्य संघटनेच्या कलावंत, तंञज्ञ यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, देवीदास खेडकर, बाबासाहेब शिंदे, दत्ता कोते जिल्हा सचिव नितीन भुतारे, संकेत व्यवहारे, संकेत होशिंग जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
६० वी राज्यनाट्य स्पर्धेत प्राथमिक फेरीत प्रथम व अंतिम फेरीसाठी निवड झालेले वात्सल्य प्रतिष्ठाणचे ज्याचा त्याचा प्रश्न या नाट्य संघटनेच्या कलावंत,तंञज्ञ यांचा बाळा नांदगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रथम दिग्दर्शक सतीश लोटके, दिपक शर्मा, रेवती शिंदे, तेजस अतितकर,अनंत रिसे,अविष्कार ठाकूर, वैष्णवी लव्हाळे, विशाल साठे, तुषार बुगे, द्वितीय रंगकर्मी प्रतिष्ठाण चे द्वितीय दिग्दर्शक शैलेश र. देशमुख, देविप्रसाद सोहोनी, विद्या जोशी, सृज्ञ टोंपे, तोडकर सर, समृध्दी बापट, जान्हवी जोशी, मोहित मेहेर, अशितोष मेनसे, अजय लाटे, शिवानी कुर्हे, संकेत अभाने, श्लको देशमुख, तनुजा कुलकर्णी, गणेश लिमकर, नाना मोरे, श्रृती देशमुख, श्रिया देशमुख, शितल देशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

