shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आशा सेविकांच्या कार्याचा सन्मान ; गुंडेगावच्या आशा सेविकांना तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित


प्रतिनिधी : किशोर चाकोते

नगर: १६ /   नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती नगर  आरोग्य विभागाच्या  वतीने आशा सेविकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती ज्योती मांडगे, वैद्यकीय अधिकारी अनिल ससाणे आदी उपस्थित होते.

      यावेळी नगर तालुक्यातुन  उकृष्ठ कामगिरी केल्याबद्दल प्रथम क्रमांकाने तालुकास्तरीय 
" सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका " पुरस्कार गुंडेगावच्या  श्रीमती. कविता संदिप कुताळ तर वाळकी उपकेंद्र अंतर्गत उकृष्ठ कामगिरी बद्दल श्रीमती. मनिषा जालिंदर कुताळ यांना उकृष्ठ कामगिरी बद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून श्रीमती. प्रिती संजय भापकर यांना " कोव्हिड योध्दा " म्हणून तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती ज्योती  मांडगे यांच्या हस्ते ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात  सन्मानित करण्यात आले.यावेळी वाळकी गटाच्या आशा गट प्रवर्तक कोमल कासार, लता प्रंभणे उपस्थितीत होत्या. 

       कोरोनाच्या महामारीत ग्रामीण भागात रुग्णांचे पालकत्व स्वीकारून त्यांची आशा सेविकांनी प्रामाणिक सेवाही केली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोविड योद्धा या आशा सेविकाच आहेत. ज्या संक्रमित रुग्णांना कुटुंबांनी वाऱ्यावर सोडले तिथे आशा सेविकांनीच त्यांची सेवा केली. यामुळे त्यांची आपण काळजी घेणे आपले कर्तव्य असल्याचे मत उपस्थितांनी केले. या सन्मानाबद्दल गुंडेगाव संरपच मंगलताई सकट, उपसंरपच संतोष भापकर,गुंडेगाव उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ .सोनाली चव्हाण, श्रीमती. पी एन अंकराम,   डॉ. विलास दाताळ,सतिश चौधरी,संतोष धावडे  पत्रकार संजय भापकर यांनी आशा स्वयंसेविकाचे गुंडेगाव ग्रामस्थांच्या वतीने  अभिनंदन केले आहे.
close