यात्रेनिमित्त होणाऱ्या गावो-गावाच्या कुस्ती आखाड्यातील कुस्त्यांना अधिक महत्त्व- राजवर्धन पाटील
-डाळज नंबर २ येथील पिरसाहेब यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेसाठी राजवर्धन पाटील यांची उपस्थिती.
इंदापूर प्रतिनिधी: डाळज नंबर २ येथील पिरसाहेब यात्रा निमित्त आयोजित कुस्ती आखाड्यास निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हातून एका कुस्तीची सुरुवात केली त्यावेळी त्यांनी मल्लांना प्रोत्साहन दिले.
कोरोना कालखंडानंतर गावोगावी यात्रेनिमित्त आखाड्यातील कुस्ती स्पर्धा सुरू झाली असून नागरिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्याच पद्धतीने डाळज नंबर २ येथील पिरसाहेब यात्रा मोठ्या उत्साहात भरत असते. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी यात्रेनिमित्त या आखाड्यास भेट दिली.
यावेळी राजवर्धन पाटील म्हणाले की, गावोगावच्या या परंपरा नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करत असल्याचे तसेच युवकांची शारीरिक क्षमता निर्माण होण्यासाठी कुस्तीला असलेले महत्त्व यातून दिसते असे मत त्यांनी व्यक्त केले.

