shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेल्वे प्रवासात तिकीट चलन निरीक्षकांकडून प्रवाशांची लूट..!

पूर्णा । प्रतिनिधी :
दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड पूर्णा परभणी रेल्वे प्रवासामध्ये सर्वसामान्य नागरिकांची चक्क रेल्वे प्रशासनातील तिकीट निरीक्षकांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्यामुळे ही लूट तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.


दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने सध्या पूर्ण क्षमतेने रेल्वे धावत आहेत पूर्ण क्षमतेने रेल्वे धावत असल्यामुळे प्रवाशांची रेल्वेनं मोठी गर्दी आहे पूर्णा ते परभणी प्रवासादरम्यान रेल्वेचे तिकीट 30 रुपये आहे परंतु 30 रुपये तिकीट असतानाही काही प्रवासी पॅसेंजर गाडी वेळेवर सुटत नसल्यामुळे नांदेड ते मुंबई दरम्यान धावणारी दैनंदिन देवगिरी एक्सप्रेस मध्ये सायंकाळी 7:30 वाजता पूर्णा रेल्वे स्थानकावर प्रवासी बसत आहेत पूर्णा रेल्वे स्थानकावर प्रवासी बसल्यानंतर मिरखेल ते पिंगळी च्या दरम्यान रेल्वे मध्ये असलेले तिकीट तपासणीस प्रत्येक प्रवाशांकडून पन्नास रुपये आधीच भार प्रवाशांकडून वसूल केला जात आहे.

त्यामुळे दक्षिण मध्ये रेल्वेच्या रॅली गाडी मध्ये प्रवास करत असताना एकीकडे तीस रुपये तिकीट त्यासोबत 50 रुपयांची अधिकचे वसूल भाडे असा एकूण प्रवास 90 रुपयाचा परभणी ते पूर्णा दरम्यान प्रत्येक प्रवासाला घडत असून याकडे दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी केली जात असून यासंदर्भात रॅलीच्या व्यवस्थापकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना रेल्वे प्रवासात तिकीट निरीक्षक काकडे सध्या सुरू असलेल्या तिकीट यांमधील नॉटी संदर्भात जाब विचारून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

तात्काळ तिकीट आता दलाली
पूर्णा रेल्वे स्थानकावर सध्या सकाळी पाच वाजल्यापासून तात्काळ तिकीट काढण्यासाठी आणि प्रवाशांची रांगेत उभे राहण्याची शक्ती होत असून या ठिकाणी काही दलालांना हाताशी धरून रेल्वेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात प्रवाशांना लुटत आहेत त्यामुळे येथील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
close