shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..!!



अल्पभूधारक शेतकर्‍याला विज जोडणी न देताच १ लाख १२ हजार रुपये बिल..!!


हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) 
दि.२,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरातील अल्पभूधारक शेतकर्‍याच्या कृषीपंपाला विज जोडणी न देताच महावितरण कंपनीने चक्क १ लाख १२ हजार १० रुपये बिल आकारल्याने महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वृत्त असे की,सेनगांव शहरातील अल्पभूधारक शेतकरी कुंडलीक दौलतराव तिडके यांच्या नावे असलेली एक हेक्टर जमिन गट क्रमांक ५६२ मध्ये असुन त्यांनी त्या शेतात सन २०१४ मध्ये बोअर घेतला व महावितरणकडे कोटीवर पोटी ६३०० रुपये भरणा केला.सदरील अल्पभूधारक शेतकर्‍याचा ग्राहक क्र.५३९६९०६६४३३६ असुन आतापर्यंत कुठला ही वीज पुरवठा देण्यात आला नसुन सतत विजपुरवठा देण्याची मागणी सदरील शेतकरी करीत असल्याच्या कारणाने विद्युत पुरवठा न देताच महावितरण कंपनीकडुन १ लाख १२ हजार १० रुपये बील आकारण्यात आले आहे.

सदरील शेतकर्‍याला विज बील वसुलीसाठी विद्युत महामंडळाकडुन मानसिक त्रास दिला जात आहे.सदरील प्रकरणाची चौकशी करुन मला विज जोडणी देऊन दोषी अधिकार्‍यावर कार्यवाही करावी असे निवेदन देखील शेतकरी कुंडलीक तिडके यांनी दिले आहे. 



        

विद्युत महामंडळाने सदरील अल्पभूधारक शेतकरी यांनी दिलेल्या तक्रारीची तात्काळ दखल न घेतल्यास विद्युत महामंडळाच्या विरुध्द न्यायालयाच्या माध्यमातून विद्युत महामंडळाला जाब विचारणार

     
पंडीत तिडके
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मराठवाडा विभागीय अध्यक्ष
close