shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नितीन शिंदे यांचा अभिष्टचिंतन सामाजिक उपक्रमाने साजरा.

 नितीन शिंदे यांचा अभिष्टचिंतन सामाजिक उपक्रमाने साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १० मार्च रोजी शिवसेना इंदापूर तालुका प्रमुख व शेटफळ गावचे सुपुत्र नितीन शिंदे यांचा अभिष्टचिंतन दिन तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
 यामध्ये इंदापूर बस स्थानक येथे मोफत शिवभोजन थाळी वाटप. वडापुरी येथील प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप व गावात सिमेंट बाके भेट दिली. तसेच शेटफळ हवेली चौकातील स्वखर्चातून रस्ता दुरुस्ती केलेल्या फलकाचे उद्घाटन संपन्न झाले. शेटफळ हवेली येथील दोशी वस्ती येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व सिमेंट बाके भेट दिली तसेच शिंदे वस्ती येथे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप गावठाण येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व सिमेंट बाके भेट दिली. चव्हाण वस्ती येथे शालेय साहित्य व सिमेंट बाके भेट दिली.
रेडा येथील प्राथमिक शाळेत शालेय साहित्य व सिमेंट बाके भेट दिली. भोडणी येथे प्राथमिक शाळेत साहित्य भेट व सिमेंट बाके भेट दिली. वकीलवस्ती येथे शालेय साहित्य व सिमेंट बाके भेट दिली. सुरवड येथे शालेय साहित्य व सिमेंट बाकेभेट दिली. यानंतर इंदापूर येथील श्रावण बाळ आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप केले तसेच शिवसेना इंदापूर शहर आयोजित अभिष्टचिंतन सोहळा खडकपुरा येथे उत्साहात संपन्न झाला.
close