shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पवार कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन समारंभ संपन्न.

बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पवार कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन समारंभ संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:बावडा येथे वालचंदनगर चौक ,अकलुज रोड नजीक नवनाथ शिवाजी पवार व पवार कुटुंब यांचे पवार कॉम्प्लेक्स याचे भूमिपूजन समारंभ दि. १० मार्च २०२२ रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, प्रशांत पाटील ,महादेव घाडगे, अनिलराव पाटील, किरण पाटील, विकास पाटील, पंडितराव पाटील, राकेश फडतरे ,शिवाजी पवार, ग्रामसेविका पावशे मॅडम तसेच गावातील इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
 यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी पवार पाटील कुटुंबीयांचा जिव्हाळ्याचा संबंध असल्याने त्यांच्या या व्यापारी वास्तूला आणि पवार कुटुंबाला माझ्या नेहमीच शुभेच्छा राहणार आहेत असे मत व्यक्त केले. तसेच आप्पासाहेब जगदाळे यांनीही शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षवर्धन पवार यांनी केले.
close