shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेटफळ तलाव बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवारी संवाद यात्रा- हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीत ८ गावात संवाद यात्रा

शेटफळ तलाव बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवारी संवाद यात्रा
- हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीत ८ गावात संवाद यात्रा
इंदापूर : प्रतिनिधी दि.३/३/२२
    शेटफळ तलावातून जलसंपदा विभागाने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक शेतकऱ्यांना बेकायदेशीर उचल पाणी परवाने दिले आहेत. यासंदर्भात लाभाक्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे उपस्थित बावडा परिसरातील लाभक्षेत्रातील ८ गावांमध्ये संवाद यात्रेचे शुक्रवारी ( दि. ४) आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संवाद यात्रेचे आयोजक शेटफळ तलाव बचाव कृती समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
  शेटफळ तलावातून लाभक्षेत्रातील सराटी- ग्रामपंचायत कार्यालय  सकाळी ८.३० वा., कचरवाडी (भगतवाडी)- मारुती मंदिर  ९.३० वा., निरनिमगाव-  मारुती मंदिर १०.१५ वा.,  पिठेवाडी- मारुती मंदिर ११ वा., लाखेवाडी- तुकाई मंदिर १२ वा., वकीलवस्ती- भवानी माता मंदिर ३.३० वा., भोडणी- पंचवटी मंदिर ४.३० वा., बावडा- पद्मावती मंदिर ५..३० वा., या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या गावांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे मार्गदर्शन करणार आहेत. शासनाच्या जलसंपदा विभागाने शेटफळ तलावातून नियम डावलून ६५ शेतकर्‍यांना उचल पाणी परवाना देण्याचा निर्णय घेऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पोटचारीने पाणी मिळण्याच्या हक्कावर १०० वर्षात प्रथमच गदा आणली आहे. सदरचे पाणी परवाने रद्द करणेसदर्भात राज्य शासनाने  दखल घेतली नाही तर शेटफळ तलावातून लाभक्षेत्रातील शेटफळ हवेली, भोडणी, सुरवड, वकीलवस्ती, लाखेवाडी, बावडा, पिठेवाडी, निरनिमगाव, कचरवाडी (बा.), सराटी या १० गावांमधील शेतीचे वाळवंट होणार आहे, असे शेटफळ तलाव बचाव कृती समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. या संवाद यात्रेत शेटफळ च्या पाण्याअभावी निर्माण होणाऱ्या संभाव्य गंभीर परिस्थितीची शेतकऱ्यांना जाणीव व्हावी व या संदर्भात शेतकऱ्यांबरोबर संवाद साधणेसाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन शेटफळ तलाव बचाव कृती समितीने केले आहे.
close