श्रीरामपूर । प्रतिनिधी : राहुरी- नगर- पाथर्डी विधानसभा मतदार संघामध्ये ना. तनपुरे यांना निवडुन येऊन अडीच वर्ष होत आहेत, परंतु मतदार संघात कुठलेही भरीव कामे झाली नाहीत यदाकदाचित जे काही किरकोळ रोडचे खडीकरण, डांबरीकरण, डागडुजी अशी कामे चालु आहेत, तेही कारकर्तांसाठी टक्केवारीच्या नादात निकृष्ट दर्जाचे झाली आहेत. तालुक्यातील माजी आ. कर्डीले आणि ना. तनपुरेंनी
एकमेकांवर टिकाटिपनी करुन मतदार संघातील शेतकरी व सर्व सामान्य मतदारांची दिशाभूल करुन त्यांचे मुळ प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आपआपल्या सोईने राजकारण करण्यासाठी एकत्र येऊ पहात आहेत. तनपुरेंनी निवडणुकीत दिलेले आश्वसने पुर्ण करण्याचे ध्येय सोडुन, होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन भा.ज.पा. मध्ये असलेले प्रमुख कार्यकर्त्यांवर दबाव टाकत आपल्या पक्षात प्रवेश करण्यावर जास्त भर दिला आहे. माजी आमदार शिवाजी कर्डीले हेही पक्षांतर करणार असल्याची चर्चा ब-याच दिवसापासून दबक्या आवाजात होत आहे.
ना. तनपुरे सध्या असलेल्या पक्षात कोणताही नेता, ईतर पक्षाचे कितीही कार्यकर्त्यांनी एकाचवेळी जरी जाहीर प्रवेश केला तरीही येणा-या सर्व निवणुकांमध्ये ना. तनपुरेंचा पराभव अटळ आहे असे सुचक इशारा प्रहार जन शक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी शिर्डी एक्सप्रेसशी बोलताना दिला.
लांबे पुढे बोलले, की गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारी व अतिवृष्टी या कारणांमुळे शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली. शेती व शेती पुरक व्यवसाय उध्वस्त झाली. अशा प्रतिकुल परिस्थितीत ना. तनपुरेंनी कुठलीही सुसज्ज आरोग्य सेवा मतदार संघात तसेच वांबोरी ग्रामीण रूग्णालयामध्ये अनेक वर्षांपासून अनेकदा मागणी करूनहीर निवासी एम डी डॉक्टरांची नियुक्ती करू शकले नाही. शासनाकडुन कोणतेच अनुदान मिळवून दिले नाही. याउलट धरण पुर्ण क्षमतेने भरलेले असताना संपुर्ण रब्बी हंगाम संपत आला तेव्हा पाणी सोडले. शेतक-यांच्या विहीर, बोअरवेलला पाणी उपलब्ध असुनही ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी महावितरण अधिकार्यांमार्फत थकीत वीज बिलाच्या नावाखाली स्वत: च्याच मतदारसंघातील शेतक-यांची चालु विद्युत पुरवठा बंद करुन ३ एच पी पंपाला ५ एच पी, ५ एच पी पंपाला ७.५ एच पी प्रमाणे चुकीची आकारणी आणि ईतर अनेक कर लावून चुकीची बिले शेतकर्यांना देऊन त्या प्रमाणे सक्तीची विजबिल वसुलीसाठी पंधरा ते तीस दिवस डिप्या बंद करुन शेतक-यांचे कांदा, गहु, हरबरा, ऊस, जनावरांची चारापिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले. शेतक-यांची आर्थिक परिस्थिती नसताना बिले वसुल केले.
त्याचबरोबर कार्य क्षेत्रातील ऊसावर कारखान्याची मान्यता मिळवून, प्रत्यक्षात बाहेरील ऊस आणुन कार्य क्षेत्रातील शेतकर्यांवर अन्याय केला. जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत कमी भाव दिला. हे सर्व शेतकरी कधीच विसरु शकत नाहीत, अनेकांना रब्बी हंगामात पाणी असुनही पिके करता आली नाही, सत्तेत नसताना ना. तनपुरे माजी आ. कर्डीलेंना हायमॅक्स आमदार म्हणायचे, स्वतः फक्त नविन डिपीचे उद्घाटन करतात व जुन्या डिप्यांची लाईट बंद करुन जनता दरबार भरवून जाहिरातबाजी करतात. ह्या सर्व प्रकाराला राहुरी तालुक्यातील व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील शेतकरी आणि सर्व सामान्य जनता ओळखुन आहे. गेल्या विधानसभेत विश्वासाने निवडुन पाठवलेल्या जनतेवरच आत्महत्येची, पश्चातापाची वेळ आलेली आहे, सुज्ञ मतदार पुन्हा विषाची परीक्षा घेणार नाहीत, ह्या डिपी मंत्र्याचे फोटो मोबाईलच्या डिपीलाही लावायची ईच्छाही कोणाची उरलेली नाही अशी माहिती लांबे यांनी दिली.
पुढे बोलताना लांबे म्हणाले
येणा-या सर्व निवडणुकीत आम्ही समविचारी पक्ष, संघटनांना सोबत घेऊन मतदारांना योग्य पर्याय देणार असल्याने सर्व सामान्य शेतकरी वर्गातील मतदार आम्हाला नक्कीच निवडुन देईल असा विश्वास सुरेश लांबे यांनी व्यक्त केला.

