शिर्डी । प्रतिनिधी :-
शिर्डी येथे पार पडलेल्या उत्तर महाराष्ट्र काँग्रेस पदाधिकारी मेळाव्याच्या निमित्ताने आलेले माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू तसेच आमदार प्रणिती ताई शिंदे यांचा शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने सन्मान करून स्वागत केले.
माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजूजी,आमदार प्रणिती शिंदे,Aicc चे सदस्य राहुलजी साळवे,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे,सुरेश थोरात यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले.
यावेळी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे श्री सुहासजी आहेर,श्री अविनाशजी दंडवते,काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मोसिन सय्यद संतोष वाघमारे गायकवाड उपस्थित होते.
याप्रसंगी पल्लम राजू,प्रणिती ताई शिंदे,सत्यजित दादा तांबे यांच्याशी मुक्त संवाद साधता आला.दोन दिवसीय सहवासात संघटनवाढि सोबतच राजकीय,सामाजिक व धार्मिक या विषयी बारीक-सारीक चर्चा करता आली ही महत्त्वपूर्ण बाब आमच्यासाठी अभिमानास्पद आहे..
सचिन चौगुले पा.
अध्यक्ष-कॉंग्रेस कमिटी.,शिर्डी शहर.
नगरसेवक-शिर्डी नगरपंचायत,शिर्डी.

