राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. १५-३-२०२२
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना केंद्रीय उपाध्यक्ष सन्मानीय श्री.बाळासाहेब लक्ष्मण सायकर
यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर , तिर्थक्षेत्र रामदरा कोळपे वस्ती ऑक्सिजन पॉईट क्र ३ परिसारामध्ये ग्रीन फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार उरळीकांचन उपविभाग कार्याध्यक्ष अक्षय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, हवेली तालुका संपर्क प्रमुख बाबासाहेब यादव, जीवन जाधव, बिरूदेव भास्कर, अभिषेक शेंडगे, दिपक महानवर, किरण भोसले,भाऊसाहेब कोळपे, भूषन भालेराव, लोणी काळभोर ग्रामस्थ, कदम वाक वस्ती ग्रामस्थ, ग्रीन फाऊंडेशन, गिरिश विभा ट्रस्ट, जनाई शिक्षण संस्था, भगवा प्रतिष्ठान, धनगर समाज सेवा संस्था उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त कोळपेवस्ती येथे देशी झाडांची लागवड करुन एक आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्र ही संकल्पना ग्रीन फाउंडेशनकडून महाराष्ट्र भर राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणी पर्यावरण पुरक कार्यक्रम हाती घेतले जात आहे.
वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रीन फाऊंडेशन मधील तरुणांचा आदर्श जर इतरांनी घेतला तर मोठी हरित क्रांती घडू शकते असे प्रतिपादन अक्षय पाटील यांनी केले. यावेळी सूत्रसंचालन बाबासाहेब यादव यांनी तर आभार किरण भोसले यांनी मानले.

