shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

🚩 साखळदंड ज्यांच्या रक्तात भिजला.!तिथे साक्षात मृत्यूही नतमस्तक झाला..!🚩


         हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती,स्वराज्याचे धाकले धनी,अजिंक्य योद्धा, महापराक्रमी,रणधुरंदर, शिवपुत्र छत्रपती संभाजी राजेंचा जन्म १४ मे १६५७ ला पुरंदर किल्यावर झाला.

         शंभूराजांना बालपणीच लढण्याचे,लढाईचे बाळकडू आपले आबासाहेब म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यातून,राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारातून मिळाले होते,छत्रपती शहाजीराजेंचा संस्काराचा वारसा लाभलेला पुत्र शंभूराजा छत्रपती झाला. बुद्धिचातुर्य आणि शौर्याचा सुरेख संगम म्हणजे छत्रपती संभाजीराजे! बालपणापासूनच संभाजीराजे पोरके झालेले होते.परंतु माँसाहेब जिजाऊँनी त्यांना तसा पोरकेपणा कधी जाणवू दिला नाही.राजेंनी त्यांच्या ३२ वर्षाच्या आयुष्यामध्ये १२० जवळपास लढाया करून सर्वच्या सर्व जिंकल्या,पण कधी माघार घेतली नाही. आणि एकदाही तह केला नाही.असे कधीही पराभव न स्वीकारणारे ते अजिंक्य योद्धे होते. ते जगातील पहिले बालराजे,बालसाहित्यिक ज्यांनी बुधभूषणम्,नखशिख, सातसतक,नायिकाभेद इत्यादी ग्रंथांचे लेखन केले,जगातील पहिले 'बुलेटप्रुफ जॅकेट' त्यांनी तयार केले.तब्बल १७ विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या २ ऱ्या वर्षी आईविना पोरके झालेले शंभुराजे! वयाच्या ३ ऱ्या वर्षी अफझलखान प्रकरण त्यांनी हाताळले,वयाच्या ८ व्या वर्षी आग्रा भेटीला जाणारे शंभूराजे!वयाच्या १२ व्या वर्षी ७ हजारी मनसब मिळवणारे शंभुराजे!वयाच्या १४ व्या वर्षी 'बुधभूषण' हा ग्रंथ संस्कृत मधून लिहणारे पहिले राजे!वयाच्या १५ व्या वर्षी १० हजार सैन्याचे नेतृत्व करणारे राजे!वयाच्या १६ व्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीच्या शिष्टमंडळासोबत इंग्रजीतून चर्चा करणारे व वयाच्या १७ व्या वर्षी वडिलांना म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना "शाक्त राज्याभिषेक" करण्याचा सल्ला देणारे,वयाच्या १८ व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज 'युवराज' झाले. वयाच्या २३ व्या वर्षी संभाजी महाराज "छत्रपती" झाले...!
           आपल्या आयुष्यामध्ये झोपेचे ४ तास सोडले तर सतत २० तास संभाजीराजे स्वराज्य रक्षणासाठी लढले. एका वेळेस त्यांना मुघल, सिद्धि,इंग्रज,आदिलशाही,पोर्तुगीज अशा स्वकीय-परकीय शत्रूंशी त्यांना लढा द्यावा लागला.शेवटच्या क्षणापर्यंत ते समतेसाठी,रयतेसाठी या स्वराज्यासाठी लढले.छत्रपती शिवाजी  महाराजांनी मिर्झाराजा सोबत तह केला तेव्हा वयाच्या ८ व्या वर्षी शंभूराजेंनी आपलं चातुर्य, शौर्य दाखवलं!शंभूराजेंचा पराक्रमअसेल,नीतिमत्ता,शौर्य,अलौकिक बुद्धिमत्ता असेल हे आजच्या पिढीच्या तरुणांनी त्यांचे विविध कलागुण आत्मसात करावेत व त्यासोबतच धाडसीवृत्ती, साहस,निर्भयता,चातुर्य, बलदंड शरीर हे गुण आत्मसात करावेत आणि आदर्श युवा पिढीची पायाभरणी करावी, हाच आजच्या तरुणांसाठी फार मोठा आदर्श संभाजीराजेंच्या चरित्रातून घेता येईल आणि त्यांच्या स्वराज्याला खरं आम्ही जागलो असं म्हणता येईल...!
           इतिहासामध्ये एक पराक्रमी अशी छत्रपती संभाजी महाराजांची संघर्षगाथा या इतिहासातून तरूणांना नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये संघर्षाची, झुंजण्याची आणि विजयाची प्रेरणा देत राहील.!आजच्या या आधुनिक युगात आपल्याला तलवारीच्या सामर्थ्याची गरज नाही, कारण "लेखणी" ही आता तलवारी पेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून आज छत्रपती संभाजीराजे या मातीवर या भारत भूमीवर त्यांनी पुन्हा जन्म घेतला तर, ते आमच्या हातामध्ये घोडा, ढाल,तलवार,गड-किल्ले, देणार नाहीत तर ते आता आमच्या हातामध्ये पाटी, पेन्सिल,पेन,वही,स्पर्धा परिक्षेची पुस्तके, कम्प्युटर, माऊस देतील आणि सांगतील की याद्वारे तू परिक्षेतुन खूप मोठा होऊन प्रधानमंत्री हो,राष्ट्रपती हो,मुख्यमंत्री हो,मंत्री हो,आमदार-खासदार हो, कुठल्याही क्षेत्रातील मोठा अधिकारी हो,इंजीनियर हो,डॉक्टर हो, वकील हो, कलेक्टर हो आणि समाजाचं कल्याण कर..! 
                 छत्रपती संभाजी महाराजांना आपल्याच स्वकीयांच्या कटकारस्थानामुळे औरंगजेबासारख्या सैतानाने कैद केले,त्यांनी त्या कैदेत जिवंतपणी मरणयातना भोगल्या परंतु,आमच्या राजाने आमची स्वराज्यअस्मिता सोडली नाही!संघर्ष काय असतो हे संभाजीराजांकडून शिकावं, स्वराज्यासाठी लढणं काय असतं.!त्यांच्यासारखा मृत्यू जगात कुठल्याच माणसाच्या वाट्याला आला नसेल इतका भयानक,अत्याचारी,क्रूर असा 'मृत्यु' महाराजांच्या वाट्याला आला!परंतु ते आपल्या मृत्यूखातर 'जीविताची भीख' मागत औरंगजेबाला शरण गेले नाही,तब्बल ४१ दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, आणि अखेर ११ मार्च १६८९ ला महाराजांचं निधन झालं... आणि हे स्वराज्य शोकसागरात बुडाले,अशा या राजाला आज त्यांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने.. त्यांच्या शौर्याला,देशप्रेमाला, बलिदानाला,विचार-कार्याला कोटी-कोटी प्रणाम! विनम्र अभिवादन!
 "संभाजीराजे ना डरे दुश्मनोसे ना डरे मौत से,
 आप लढे भी तो जान से, और मरे भी तो शान से...!
----------शब्दांकन---------
शिवश्री.सतिष उखर्डे
--टेंभूर्णीकर--
(शिवव्याख्याते तथा इतिहास अभ्यासक)
मो.नं.- ९४२२९९२३१०
close