shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्याचे भविष्य राष्ट्रीय सुवर्ण कन्या खुणावत आहे..!


कु प्रणाली प्रकाश वडार ही नववीत शिकत असून त्या इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगलीच्या असून विद्यार्थी दशेत बॅडमिंटन हा खेळात सहभागी होऊन अनेक प्रमाण पत्रे ट्रॉफी जिंकली आहेत. राज्य आणि देश पातळीवर अनेक बक्षिसे मिळवले आहेत.गोवा येथे झालेल्या दिनांक 25 ते 27 फेब्रुवारी 2022 दरम्यान राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मुलींच्या वयोगटात कु.प्रणाली प्रकाश वडार  प्रथम क्रमांक मिळवला. कॅनडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

अनेक पेपर्स कात्रणे आणि यू ट्यूब मध्ये माहिती दिलेली आहे. तिला आत्मविश्वास देवून वाढीस लागावे म्हणून १३ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पुणे येथे नारी सन्मान सोहळ्यात वडार प्रेरणा कन्या रत्न पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे जेणेकरुन पंचक्रोशीत समाजाचे नाव उज्ज्वल होईल व आत्मविश्वास वाढीस लागेल. या शिवाय तिला खास आवड पोहणे सुध्दा आहे.

          🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
close