shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रेरणा पतसंस्थेचा एकोणतिसावा वर्धापन दिनाचे औचित्य साधत क्यू आर कोड, यूपीआय मोबाईल ऑपलौंचिंग..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०६ मार्च २०२२


प्रेरणा पतसंस्थेचा एकोणतिसावा वर्धापन दिनाचे औचित्य साधत क्यू आर कोड, यूपीआय मोबाईल ऑपलौंचिंग..!!

राहुरी : गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेच्या 29 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे ह्यांनी गुहा सारख्या ग्रामीण भागातील जनतेला बँकेचे व्यवहार करण्यासाठी क्यू आर कोड, यूपीआय मोबाईल ऑप व मल्टिस्टेट ग्राहकांना एटी एम कार्डचा लाँचिंग कार्यक्रम संपन्न झाला.
           या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रसाद तनपुरे होते. यावेळी राज्य पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे,नाशिक विभागीय पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, ज्योती पतसंस्थेचे चेअरमन रविकाका बोरावके, वासुदेव काळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हा बँकेचे संचालक अरुण तनपुरे, डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक शाम निमसे, साई आदर्शचे संस्थांपक शिवाजी कपाळे,जिल्हा निबंधक (सह )दिग्विजय आहेर, सहा निबंधक दिपक नागरगोजे, सरपंच सौं उषा चंद्रे, आदि. प्रमुख उपस्थित होते.


       यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले की प्रेरणा पतसंस्थेचे सुरेश वाबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास संपादन करून ठेवी गोळा करून त्याच भागातील तरुणांना कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे सावकार की च्या जाळ्यातून ग्रामीण भागातील लोकांची सुटका केली.

रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे सतीश मराठे म्हणाले की प्रेरणा पत संस्थेचे कामकाज उत्तम चालू आहे प्रेरणा पतसंस्था ही रोल मॉडेलचं काम करू शकतात.

यावेळी काका कोयटे वसंत लोढा,शिवाजी कपाळे ह्यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संस्थांपक सुरेश वाबळे ह्यांनी प्रास्ताविक केले.यावेळी सुरेश बनकर,जेष्ठ कार्यकर्ते गंगाधर जाधव, के एम पानसरे, द्वारकानाथ बडधे, नारायण जाधव, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब उंडे, अण्णासाहेब चोथे, सुरेश निमसे, समता महिला पतसंस्थेच्या चेअरमन संगीता बुधवंत,सुमित वाबळे, जगन्नाथ दौले, शौकत शेख, प्रेरणा पतसंस्था व मल्टिस्टेटचे सर्व पदाधिकारी विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. जावेद शेख ह्यांनी स्वागत तर प्रा. वेणूनाथ लांबे ह्यांनी आभार मानले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close