shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुटुंब कल्याण शिबिरांचे नियमाप्रमाणे नियमित आयोजन करून शंभर टक्के उदिष्टपूर्ती करावी-सभापती प्रताप शेळके..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. गुरूवार दिनांक १७ मार्च २०२२

कुटुंब कल्याण शिबिरांचे नियमाप्रमाणे नियमित आयोजन करून शंभर टक्के उदिष्टपूर्ती करावी-सभापती प्रताप शेळके..!!
 

अहमदनगर : कुटुंब कल्याण शिबिरांचे नियमाप्रमाणे नियमित आयोजन करून १०० टक्के उदिष्टपूर्ती करण्यात यावे, अशी सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती प्रताप शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे सदस्य सोमनाथ पाचारणे, कविता लहारे, सविता अडसुरे, पुष्पा वराळ, समितीचे सचिव संदिप सांगळे, डॉ. अभिराज सुर्यवंशी, डॉ भागवत दहिफळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मोहन शिंदे साथरोग अधिकारी व आरोग्य, बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बांधकाम विभागाकडील आरोग्य संस्थांचे बांधकांमांचा आढावा यावेळी घेण्यात आला. चालू असलेली बांधकामे वेळेत पूर्ण करण्याच्या निधी पूर्ण खर्च होईल. यादृष्टीने बांधकाम विभागाने नियोजन करुन प्रशासकिय मान्यता दिलेल्या बांधकामांना कार्यरंभ आदेश देण्याबाबत सभापती यांनी सूचना दिल्या.

साथरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तालुकास्तरावर दुषित पाणी नमुना असलेल्या गावांचा आढावा घेऊन तात्काळ उपाययोजना करणेच्या सूचना यावेळी सभापती शेळके यांनी दिल्या.
समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या कामाचा आढावा वैद्यकिय अधिकारी स्तरावर व तालुका आरोग्य अधिकारी यांचे स्तरावर नियमित घेण्याच्या तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांनी उपकेंद्र भेटी वाढविण्याच्या सूचना सभापती यांनी दिल्या.

रुग्ण कल्याण नियामक समितीच्या आढावा बैठक जिल्हा परिषद सदस्यांच्या समन्वयाने नियमित घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

कोविडसाथजन्य आजाराबाबत तालुक्यांची सदयस्थिती, तपासण्या व कोविड लसीकरण याचा आढावा घेण्यात आला. ज्या नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घ्यावयाचा राहिला असेल, व ज्यांनी अद्याप लसीकरण करुन घेतलेले नाही, त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रामध्ये जाऊन लसीकरण करुन घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

वय वर्षे १२ ते १४ वयोगटातील (१५ मार्च २०१० पूर्वी चा जन्म असलेल्य) बालकांकरीता केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार CorBEvax लसीकरण करण्यात येणार आअसलेल्यारिता अहमदनगर जिल्हयासाठी १५०००० डोसेस प्राप्त झालेले आहेत. 

या लसीचा दुसरा डोस २८ दिवसांनतर देण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन उपाध्यक्ष तथा सभापती प्रताप शेळके यांनी केले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close