shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर तालुका पोलीस स्टेशन अहमदनगर व गंगामाता वाहन शोध संस्थेचा अभिनव उपक्रम १०५ वाहन मालकांचा लागला शोध..!!



अनेक दुचाकी मालकाच्या चेहरा आनंद..!!

नगर प्रतिनिधी ( शिवा म्हस्के)
(दि.१६) नगर तालुका पोलीस विविध कामांसाठी नेहमी अग्रेसर ठरत आहे गुन्ह्यांची उकल असो किंवा  चोरीला गेले सोनं पुन्हा मुळ मालकाला मिळुन देणं असो अनेक दिवसांपासून नगर तालुका स्टेशन परीसरात शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त केलेली असतात मात्र न्यायालयीन प्रक्रीयेमुळे वाहनाचे मालक मिळून येत नसल्याने सदर वाहन पोलीस ठाणे आवारात वर्षानुवर्षे मलकाच्या प्रतिक्षेत धुळखात पडून आहेत . त्यामुळे पोलीस ठाण्याचा परीसर बकाल व विचित्र दिसून येतो . त्यामुळे पोलीस ठाणे सुशोभिकरणास बाधा  निर्माण होत आहे . 



ही बाब लक्षात घेऊन नगर तालुका पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक  राजेंद्र सानप यांनी वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला . नगर तालुका पोलीस स्टेशन आवारातील वर्षानुवर्षे धुळखात पडलेली बेवारस व विविध गुन्ह्यातील जप्त वाहने यांचे मुळ मालकाचा शोध घेऊन ती वाहने मुळ मालकांना परत देण्याचे आदेश पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी  आदेश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नगर तालुका पोलीस स्टेशन आवारातील अनेक वर्षे धुळखात पडलेल्या वाहनांचे चेसीस व इंजीन नं वरून २ दिवसांत एकून १०५ वाहनांचे मुळ मालकांचा शोध मावळ तालुक्यातील परंदवाडी जिल्हा पुणे येथील गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने पोलीसांनी शोध लावला आहे.पोलीस अधिक्षक  मनोज पाटील  अहमदनगर यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधिक्षक  सौरव कुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशन आवारात मालकाच्या प्रतिक्षेत अनेक वर्षापासून बेवारस , अपघात व विविध गुन्ह्यात जप्त असलेल्या १०५ वाहनाच्या मालकांचा शोध घेण्यास सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप , मुद्देमाल कारकून पोलीस अंमलदार जयदत्त बांगर, होमगार्ड शुभम म्हस्के, व संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे , भारत वाघ , गोरख नवसुपे , संजय काळे यांना यश आले आहे. सदर शोध लागलेल्या वाहनांच्या मालकांनी आपली वाहनांची ओळख पटवून व पुरावे देऊन परत घेऊन जाणे बाबत आव्हान पोलीसांनी केले आहे . 


नगर तालुका पोलीस स्टेशन , भिंगार , अहमदनगर आवारात बर्याच गाड्या पडून आहेत . त्यापैकी १०५ वाहन मालकांचा शोध लागला असून बाकी वाहन मालकांचा शोध लावण्याचा तपास चालू आहे . तरी वाहन मालकाने वाहनांचे नोंदणी क्रमांक , वाहनाचा प्रकार , चेसीस नं.इंजीन नं . वाहन | मालकाचे नाव , पत्ता यांची यादी पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेली आहे . तसेच सोबत वाहानांची यादी सादर केली आहे. सदर यादी मध्ये आपले वाहन नाव असल्यास अशा मालकांनी ओळख पटवून आपले वाहने घेऊन जावीत . 

गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने शोध लागलेल्या एकून 105 वाहन मालकांशी संपर्क साधला जाणार आहे . व शोध लागलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने तात्काळ नगर तालुका पोलीस स्टेशन , भिंगार , अहमदनगर येथून वाहनांची कागदपत्रे स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र दाखवून घेऊन जावीत . सदरची वाहने पत्र मिळताच 15 दिवसांच आत घेऊन जावीत . नसता ते वाहने बेवारस समजुन सरकारी प्रक्री या पुर्ण करुन निलाव करण्यात येणार आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस  राजेंद्र सानप - नगर तालुका पोलीस स्टेशन अहमदनगर
close