shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्त्रीशक्ती

स्त्रीशक्ती

निश्चयाचे बळ, कल्पकतेचे माहेर
संस्कार सागर, स्त्री शक्ती...१


नजरेत धाक, सूचक भेदक
मायेचा तो स्त्रोत, स्त्री शक्ती...२

कन्यारूपी सुख, बहिणीची माया
आईचे मांगल्य, स्त्री शक्ती...३

अर्धांगीचे रूप, वंश शिल्पकार
घडविते वारस, स्त्री शक्ती...४

मृदल रजई, जैसी मायेची पाखर
तरीही करारी, स्त्री शक्ती...५

विचारांचा वसा, सल्लाही अचूक
रोकडा उपदेश, स्त्री शक्ती...६

गुरु आहे तीच, वेसणही तीच
दाखविते मार्ग, स्त्री शक्ती...७

आदीमाया शक्ती, भक्तीचेही रूप
जपते वात्सल्य, स्त्री शक्ती...८

स्त्रीयांचे हे गुण, विश्ववंदनीय
साठवावे हृदयांत, चंदू म्हणे...९

स्त्रीशक्ती

निश्चयाचे बळ, कल्पकतेचे माहेर
संस्कार सागर, स्त्री शक्ती...१

नजरेत धाक, सूचक भेदक
मायेचा तो स्त्रोत, स्त्री शक्ती...२

कन्यारूपी सुख, बहिणीची माया
आईचे मांगल्य, स्त्री शक्ती...३

अर्धांगीचे रूप, वंश शिल्पकार
घडविते वारस, स्त्री शक्ती...४

मृदल रजई, जैसी मायेची पाखर
तरीही करारी, स्त्री शक्ती...५

विचारांचा वसा, सल्लाही अचूक
रोकडा उपदेश, स्त्री शक्ती...६

गुरु आहे तीच, वेसणही तीच
दाखविते मार्ग, स्त्री शक्ती...७

आदीमाया शक्ती, भक्तीचेही रूप
जपते वात्सल्य, स्त्री शक्ती...८

स्त्रीयांचे हे गुण, विश्ववंदनीय
साठवावे हृदयांत, चंदू म्हणे...९

रचनाकार : 
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने देशभक्तकोशकार, पुणे.
मोबाईल : ९८८१३७३५८५
close