स्त्री ..
आश्वासने कागदाची
म्हणता हवे ते मागा
फुटूनि जाईलं उगा
फुगवालं किती फुगा
महिलासाठी केल्या
आरक्षीत त्या जागा
आरक्षीत जागेवरती
बसलेला असे टगा
शरीर वरून सुडौल
मनास पडल्या भेगा
जळ फळाट पुरुषां
मुली चालल्या वेगा
म्हणता केल्या सोई
रे खास महिला वर्गा
महिलांसाठी बंददारे
मंदीरं असो वा दर्गा
पुरूषी नजरा चाळवे
कुठे फाटलायं झगा
विणे मखमली वस्त्र
कच्चा आतूनि धागा
म्हणे नारी सुरक्षीत
मोकळे प्रमाणे वागा
महिलापेहराव असा
हे ही तुम्हींचं सांगा
यशस्वी होताचं नारी
पुरूषी अहम् जागा
महिला दिनी निदान
दिल्या वचना जागा
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com
२)
सावित्रीमाय ..
क्रांतीसूर्य तव पति
उभा खंबीर सोबती
सावित्रीमाय आमची
तूचि खरोखरी सती
छळ छळले माईला
विरोधी सैतानी वृत्ती
शतकातूनि अवतरे
अशी अमोल व्यक्ती
जाणी शिक्षण महती
उजळती लक्षज्योती
दिधला प्रकाश सर्वा
म्हणती क्रांतीज्योती
महिला शिखरावरती
आज स्व पायावरती
निमीत्त तूचि केवळ
उपकार जगा वरती
नव्या युगास कळावी
सारी समग्र माहिती
गुंजारव होता जगती
दिगंतरा जावी महती
-- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com

