shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदवीधर सेलच्या इंदापूर तालुका कार्याध्यक्ष पदी गोविंद पाडुळे यांची निवड


प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

  इंदापूर: दि. ८/   इंदापूर तालुक्यातील  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदवीधर सेलच्या इंदापूर तालुका कार्याध्यक्ष पदी कालठण नं.१ येथील  गोविंद पाडुळे यांची निवड करण्यात आली.

 राज्यमंत्री  मा. श्री.दत्तामामा भरणे व जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रदिपदादा गारटकर यांच्या हस्ते श्री गोविंद पाडुळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तालुकाध्यक्ष मा. श्री.हनुमंतआबा कोकाटे पाटील व पदवीधर सेलचे तालुका अध्यक्ष मा. श्री.रमेशतात्या पाटील यांनी गोविंद पाडुळे यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

  यावेळी बोलताना मा.भरणे मामा यांनी  सुशिक्षीत तरुणांनी  जास्तीत जास्त प्रमाणात राजकारणात यायला पाहिजे असे मत व्यक्त केले. श्री गोविंद पाडुळे यांनी मा. पवार साहेब, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा व मा. सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष व पदवीधर  संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे आश्वासन दिले. उपस्थित सर्वांनी श्री पाडुळे यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
close