shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चार दिवसापासुन धानोरा मोत्या गाव अंधारात...!

पूर्णा । प्रतिनिधी :- पूर्णा तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या धानोरा मोत्या या गावचा विद्युत पुरवठा मागील चार दिवसापासून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खंडित केला असून यामुळे पिण्याच्या पाण्यासह दळणाची सुविधा ठप्प झाली असून ऐन परीक्षेच्या काळामध्ये विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.


पूर्णा तालुक्यातील कावलगाव जिल्हा परिषद सर्कल मधील सर्वात शेवटचे गाव म्हणून धानोरा मोठ्या परीक्षेकडे पाहिले जाते.

गावची लोकसंख्या जेमतेम पाच हजार या गावांमध्ये मागील चाळीस ते पन्नास वर्षापासून विद्युत वितरण कंपनीच्या वतीने गावाला विद्युत पुरवठा केला जातो.
 
विद्युत पुरवठा सुरू असताना यावर्षी सगळीकडेच मोठ्या प्रमाणात वसुलीसाठी अधिकाऱ्यांनी गावात वसुली मोहीम सुरू केली आहे. या वसुली मोहिमेचा मार्च च्या नावाखाली पाच हजार लोकसंख्या असलेल्या धनुरवत या गावालाही मोठा फटका बसला.

सध्या सणासुदीचे दिवस असताना अनेक लहान बालके गावा मध्ये आलेली असताना चक्क चार दिवसापूर्वी कावलगाव येथील मुख्य विद्युत वाहिनी वर सुरू असलेला वीज पुरवठा खंडित केला आहे. अचानक शिमगा उत्सव सुरू असताना चार दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागत असून गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा खंडित झाली आहे. गावातील विद्युत पंप बंद झाले आहे. तर विद्युत पंप बंद असतानाही गावांमधून पिण्याच्या पाण्याच्या मोटारी बंद झाले आहेत. 



तर सर्वसामान्य नागरिकांना पिठाची गिरणी बंद झाल्यामुळे वीज भट्टीचे कामगार तसेच ग्रामीण भागांमधून ऊस तोडणीसाठी आलेले कामगार यांचीही मोठी गरज निर्माण झाली आहे. तर सध्या एकीकडे दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी लाईटची व्यवस्था महत्त्वाची आहे.परंतु अचानकच विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. तर या गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतर पर्यंत असलेल्या कावलगाव येथील गावाचा आश्रय घेऊन नागरिकांना पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. तर एकीकडे गोदावरी नदी गावालगत असतानाही अचानक विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांची दळणवळण व्यवस्था बंद झाली आहे. मागील चार दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय झाली असून गावातील हातपंपाने तेवढा पाणीपुरवठा होत नाही. निदान विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी तरी विद्युत पुरवठा सुरळीत करावा.

 दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन गावचा वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी गावातील नागरिकांच्या वतीने केली जात आहे.
close