shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कालबाह्य शिक्षणा ऐवजी विध्यार्थ्यांना शिक्षकांनी माणुसकीचे धडे शिकवावेत - प्रकाश कांबळे

पूर्णा । प्रतिनिधी :
अंधश्रद्धा, रूढी आणि परंपरा यांचे ब
धडे गिरवणाऱ्या शिक्षणापेक्षा माणुसकी व
राष्ट्रीय निष्ठा निर्माण करणारे शिक्षण शाळेतून विध्यार्थ्यांना शिक्षकांनी द्यावेत,असे परखड विचार सुप्रसिद्ध आबेडकरवादी विचारवन्त रिपाई नेते मा
प्रकाश कांबळे यांनी राष्ट्रवादी संघटनेच्या शिक्षक -पालक मेळाव्यात व्यक्त केले.

ते पूर्णा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी मा विनोद कनकुटे यांची निवड झाल्याबद्दल व‌ त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजिय मेळाव्यात व्यक्त केले,ते या
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्णा पंचायत समितीचे सभापती अशोकराव बोकारे हे होते.

  कांबळे आपल्या भाषणांत पुढे म्हणाले,'
नवरा मेल्यानंतर स्त्रीने सती गेलं पाहिजे,नसता धर्म बुडतो,स्त्रीने शिक्षण घेऊ नये नसता धर्म बुडतो,शूद्राने शिक्षण घेऊ नये,नसता धर्म बुडतो,हे सर्व थोतांड
असून माणसाला अधोगतीकडे नेणारे अंधश्रद्धा दृढ करणारे मनुस्मृतीचे षडयंत्र आहे,आज स्त्रिया पती मेल्यानंतर सती जात नाहीत,कुठे बुडाला धर्म?उलट शिक्षण घेऊन स्त्रिया राष्ट्रपती,प्रधानमंत्री,आमदार खासदार,कलेक्टर झाल्या मोठ्या हुद्द्यांवर
गेल्या,कुठे बुडाला धर्म असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला?भारतरत्न डॉ बाबासाहेबआंबेडकरांचा नामोल्लेख करून ते म्हणाले,एका शूद्राने भारत देशाची राज्यघटना लिहिली,ज्यावर 73 वर्षे झालीदेश चालतो आहे,कुठे बुडाला धर्म? शिक्षकांनी आता शाळेत विध्यार्थ्यांना कालबाह्य झालेले व अनिष्ट रूढी परंपरा जपणारे शिक्षण देण्याऐवजी माणुसकीचे धडे देणारे व राष्ट्रीय बाण्याचे,देशाला प्रगतीकडे नेणारे शिक्षण द्यावे,असे विचार मांडले. 

        विचार मंचावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचेपूर्णा
तालुकाध्यक्ष शहाजी देसाई, गजानन अंभोरे,गट शिक्षण आधिकारी बालाजी कापसीकर,शिक्षक संघटनेचे नेते सुभाष शेंगुळे,प्रकाश रौदळे ,प्राचार्य केशव जोंधळे,आदींसह विनोद कनकुटे यांचे
आईवडील,त्यांची सहचारिणी यांच्यासह
सर्व आप्तेष्ट नातेवाईक या कार्यक्रमास अगत्याने उपस्थित होते. या शिक्षक पालक मेळाव्यास परभणी जिल्ह्यातीलपूर्णा,परभणी,गंगाखेड,पालम,सोनपेठ,जिंतूर,पाथरी,मानवत,सर्व तालुक्यातून मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिक्षक प्रतिनिधींनी हजेरी लावली होती,

 या प्रसंगी विनोद कनकुटे यांचा पुष्पहाराने मोठा सत्कार करण्यात आला,संविधान गौरव समितीच्या वतीनेही त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाक्षरीने तैलचित्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती कदम यांनी केले,तर आभार प्रदर्शन अनिल ढाले यांनी केले.

हा शिक्षक पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी विलास और कांबळे, ब्रम्हा ढगे,विठ्ठल काळे,संजय सोनकांबळे,सतीश कोमटवार, सय्यद पटेल,डी झेड गायकवाड,संजय गद्दमवार,नागेश वंणजे, विजय गायकवाड,बालू पारखे,वर्षाताई पाटील,संपदा घुले,महाजन सर,दीपक मेहत्रे, पंढरीनाथ धाडवे स्मिता दिग्रसकर,,चनंदा खंदारे,पद्माकर भोसले,पठाण सर, आदि बहुसंख्य शिक्षक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न घेतले,कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक व पालक उपस्थित होते.
close