पूर्णा । कलीम सय्यद
पूर्णा:- ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील आनंद नगर येथील जानकी हाॅस्पीटल येथे ७ मार्च २०२२ ते १२ मार्च रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात, महिला व मुलींचा समावेश आहे.
यामध्ये बाह्यरुग्ण तपासणी, आंतररुग्ण तपासणी, रक्त तपासणी (सीपीसी, थायरॉइड, लीपीड प्रोफाईल व शुगर तपासणी, कर्करोग निदान (पॅप स्मीयर टेस्ट, बीएसई), सोनोग्राफी तपासणी विनामूल्य करण्यात येणार आहे. या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे ७ मार्च २०२२ रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, डॉ हरिभाऊ गाडेकर, वैद्यकीय अधिक्षक, शिवसेना नेते संतोष एकलारे, राजू भालेराव, जगदीश जोगदंड, शाम कदम, आनंद अजमेरा यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
सदर मोफत शिबीराचा शहर व तालूक्यातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ दिपाली सचिन भायेकर (स्त्री रोग तज्ञ पूर्णा) यांनी केले आहे.: पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त वैद्यकीय अधीक्षक हरीभाऊ गाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ शिंदे, डॉ देशमुख, परिचारिका, व सर्व महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी, कर्मचारी चव्हाण, फैजूला खान, फारुखी अब्दुल भई, झांबरे सिस्टर, भान परिचारिका राठोड, दिपीका, पुजा काळे, उज्वला आवटे, वारुडे, भाग्यश्री, डॉ नदीम, डॉ फरान यांनी महिलांचा गौरव केला.

