shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगाव दलितवस्ती मध्ये प्रथमच उत्कृष्ट सिमेंट रस्त्याचे काम


 उत्कृष्ट सिमेंट रस्त्यांचे काम झाल्याने नागरिकांमधून  समाधान

 प्रतिनिधी : बाबासाहेब आगळे

गुंडेगाव : १४ /  नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील दलीत वस्ती गेल्या ४० वर्षापासून रस्त्यापासून वंचित होती.तसेच दरवर्षी दलीत वस्तीत पथदिवे हाच एक विकासाचा मुद्दा  घेऊन सत्ता मिळवण्याचे माध्यम गुंडेगाव गावठाण तसेच दलितवस्तीमध्ये दिसत होते परंतु या वेळेच्या सत्ताधारी गटाने दलीत वस्ती मध्ये सिमेंट रस्ता करुन एक विकासाचा महत्वाचा मुद्दा रस्ते असतो हे दाखवून दिले आहे.

 दलित समाज विकासापासून कायमच वंचित रहात असल्याचे चित्र कायम ठिकठिकाणी दिसते . असेच उदाहरण गुंडेगाव येथे पहायला मिळत होते.मागील चाळीस वर्षांत दलितवस्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा ठोस असा विकास झाला नव्हता.या चाळीस वर्षांत अनेक सरपंच, उपसरपंच,सदस्य होऊन गेले पण गावठाण ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य यांच्या माध्यमातून दलितवस्ती विकासाचा कोणताही शाश्वत असा विचार केला गेला नाही.तसेच गावठाणमध्ये माणूस निवडताना मतदाराची देखील खूप मोठ्या चूका झाल्या असे प्रत्येकाच्या तोंडून छुपा सुर बोलला जात आहे.पण मागिल वर्षी इतिहास घडला व दलितवस्तीला सोनेरी दिवस आले.कारण सरपंच पद हे आरक्षित होऊन पहिली दलित महिला सरपंच पदावर विराजमान झाल्या त्या म्हणजे सौ.मंगलताई संतोष सकट त्यांना कुठलाही राजकीय वारसा किंवा पाठबळ नसतांनाही त्यांनी सामाजिक जाणीवेतून दलित समाजाच्या खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात  केली आहे.

     सरपंच यांचे पती संजय सकट यांनी पाणीटंचाई काळात पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन केले, तसेच पथदिवे लाईट पूर्ण गावामध्ये बसवले, तसेच माऊली कुताळ यांच्या मार्फत दलीत वस्तीतील सिमेंट रस्ता गणपत आढाव यांच्या घरापासून ते मांगिरबाबा मंदिरापर्यंत तसेच अंबादास टकले घरापासून ते साहेबराव सकट यांच्या घरापर्यंत असा एकूण रक्कम ६,०४,६५९/- या रस्त्याचे काम अतिशय मजबूत व दर्जेदार केले आहे.तसेच गावातील मुख्य गटार योजना पूर्ण केली आहे. अनेकांना दलित वस्तीत घरकुल मिळवून दिले आहेत,आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे गावातील मुख्य चौक सुशोभितकरण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब हराळ, संतोष धावडे, भाऊसाहेब हराळ, संतोष सकट, पोपट तांबे, साहेबराव सकट, अंबादास टकले, शैलेश पिंपरकर, यांनी समाधान व्यक्त केले.
    
"दलितवस्ती योजने अंतर्गत काम करणारे अनेक सरपंच सदस्य पाहिले पण मी आश्वासन न देता काम करणारी सरपंच आहे. रस्ते छोटे-छोटे असले तरी अत्यंत महत्त्वाचे आहेत वार्डातील प्रत्येक छोटे मोठे विकास कामे मजबूत व दर्जेदार करण्याचा माझा प्रयत्न आहे. 
सरपंच सौ. मंगलताई सकट"
close