shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नाव ज्योती लक्ष्मणराव साधू वय 65 वर्षे व्यवसाय म्हणाल तर...

निवृत्त अंगणवाडी सेविका ज्योती लक्ष्मणराव साधू यांनी एकात्मिक बाल विकास केंद्रामध्ये परभणीच्या गौर गावात स्वतःच्या आयुष्याचा 36 वर्षे कार्यकाळ
घालवलाय..!
पुर्णा ।  प्रतिनिधी :
देशाचं भविष्य जिथं घडवल्या जात कोवळ्या मनावर जिथ संस्कार होतात जिथं होते देशाच्या महान महापुरुषांची ओळख जिथ गिरवले जातात मराठी अ आ इ ई चे धडे त्याच गौर गावातील अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये शिकवणाऱ्या या होत्या सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका ज्योती लक्ष्मणराव साधू

परिस्थिती म्हणाल तर जेमतेम गेल्या 6 महिन्यांपासून पूर्णा पंचायत समितीमध्ये ज्योती साधू या ये-जा करत आहेत.

काम म्हणाल तर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसाठी शिल्लक पण निवृत्त अंगणवाडी सेविका ज्योती साधू यांच्यासाठी जन्माची शिदोरी.

अंगणवाडी सेविका ज्योती लक्ष्मणराव साधू यांना बाल विकास प्रकल्प अधिकारी पूर्णा यांनी वयाच्या 65 व्या सेवानिवृत्त केलय.

सेवानिवृत्त केलय म्हणण्यापेक्षा एकात्मिक बाल विकास सेवा केंद्राच्या नियमाप्रमाणे त्या सेवानिवृत्त झाल्यात देखील पण त्यांचा लढा चालू आहे तो त्यांची जन्माची शिदोरी मिळवण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविका निवृत्त झाल्यानंतर त्यांचा लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन या कंपनीकडे त्यांनी बजावलेल्या कार्यकाळांनुसार त्यांची हक्काची रक्कम थोडक्यात सांगायचं तर विमा जमा होतो तीच रक्कम मिळवण्यासाठी निवृत्त अंगणवाडी सेविका ज्योती साधू यांचा लढा सुरू आहे.

ही बाब आमचे युवाराज्य न्यूज लाईव्ह चे पत्रकार दिनेश कुलकर्णी यांच्या कानावर पडली तेव्हा आमची टीम आणि पत्रकार दिनेश कुलकर्णी यांनी गाठल ते थेट पूर्णा पंचायत समिती कार्यालय.


close