shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संधी कुणीच कोणाला देत नाही तुम्हाला तरी कोण देईल. आवडत्या क्षेत्रात नैपुण्य मिळवा तीच तुम्हाला शोधत येईल - डॉ. प्रकाश पांढरमिसे"

" संधी कुणीच कोणाला देत नाही तुम्हाला तरी कोण देईल. आवडत्या क्षेत्रात नैपुण्य मिळवा तीच तुम्हाला शोधत येईल - डॉ. प्रकाश पांढरमिसे"
 
  इंदापूर प्रतिनिधी:  इंदापूर तालुक्यातील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे जिजामाता महाविद्यालय सराटीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन सुरवड येथे करण्यात आले होते. या शिबिराला दि.१४ मार्च २०२२ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. प्रकाश पांढरमिसे. यांनी सदिच्छा भेट दिली. व विध्यार्थ्यांना राष्ट्र उभारणीत तरुणाईचे योगदान "या विषयावर व्याख्यानपर मार्गदर्शन केले.त्याप्रसंगी ते म्हणाले जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सदस्य मा. अप्पासाहेब जगदाळे यांनी इंदापूर, दौंड, करमाळा, माढा, माळशिरस या तालुक्यातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात होतो आहे.त्याचा अधिकाधिक लाभ विद्यार्थी घेत आहेत.या विद्यार्थ्यांनी शिकून खूप मोठे व्हावे व महाविद्यालयासह संस्थेचे व आपल्या गावाचे नाव मोठे करावे.आजच्या या महाकाय स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.आज बेरोजगारी आणि बेकारीची संख्या मोठ्याप्रमाणात वाढते आहे.
    मित्रांनो,संधी कुणीच कोणाला देत नाही. तुम्हाला तरी कोण देईल. आवडत्या क्षेत्रात नैपुन्य मिळवा तीच तुम्हाला शोधत येईल. आवडीच्या क्षेत्रात नैपून्य मिळवले तरचआजच्या या वाढत्या स्पर्धेच्या युगात तुम्ही टिकू शकाल.भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना नुसते मेरा भारत महान म्हणून चालणार नाही.भारताला नुसते विकसितच नव्हे तर जगाच्या नकाशावर दिमाखात  ठळकपणे उठून दाखवायचे असेल तर आजच्या तरुणाईने आपले मन, मेंदू, मनगट आणि मणका मजबूत करायला हवा. आपल्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्राला महासत्तेच्या दिशेने झेप घ्यायला वेळ लागणार नाही.
     उगवत्या सूर्याला जागी करणारी माणसं आयुष्याला यशस्वी गवसणी घालू शकतात. अशक्य हा शब्द ज्यांच्या शब्दकोशात नसतो त्यांनाच तरुण म्हणतात. या तरुणाईने जर एखादी गोष्ट मनावर घेतली तर खूप मोठे परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही.
           आजच्या तरुणाईने ज्यांच्या हाती शून्य होते.अशा शून्यातून विश्व् निर्माण केलेल्या कर्तबगार व्यक्तींच्या यशोगाथा, जीवनगाथा वाचल्या पाहिजेत. इतिहासात होऊन गेलेल्या महापुरुषांचा भूतकाळ जरूर वाचावा. या भूतकाळाचा वर्तमान बनवावा.तोच येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी भविष्यकाळ होईल. महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करताना वाद्यांचा जागर करण्याऐवजी विचारांचा जागर करायला हवा. महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी त्यांनी सांगितलेले विचार डोक्यात घेऊन त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. तरुणाईच्या सळसळत्या रक्ताला अशक्य असं काहीच नसतं.युवा या शब्दाला उलटा करा तो वायू होतो. जो वायूच्या वेगाने जाऊन प्रगतिकारक परिवर्तन घडवू शकतो. ती जिद्ध प्रत्येकाने अंगी बाळगली पाहिजे.आजच्या या तरुणाईने 'नाचण्या' ऐवजी 'वाचण्याला' जर महत्व दिलं तर ही तरुणाई क्रांतीमय परिवर्तन करू शकतते.आजच्या या महाकाय स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर तरुणाईने ज्ञानाच्या विविध क्षेत्रात यश आणि संशोधन संपादित केले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेचे हे सात दिवशीय शिबीर शिबिरात सहभागी झालेल्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. श्रमसंस्कारा बरोबरच वर्तनात परिवर्तन घडवून आयुष्याला सकारात्मक दिशेने नेहू शकते. असे मत डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी व्यक्त केले व शिबिरार्थी विध्यार्थ्यांना शिबिरातील उरलेल्या दिवसांसाठी शुभेच्छा दिल्या.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.विजय गेंड यांनी केले.त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील चार दिवसात केलेल्या कामाचा अहवाल सादर करताना गावकऱ्यांनी केलेले सहकार्य ही आमच्या साठी खूप मोठी पावती आहे असे मत व्यक्त केले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी शिबिराविषयीं आपले अनुभव सुयश माने देशमुख ,उमेश केचे, प्राजक्ता घोगरे,दिशा चव्हाण यांनी सांगितले .
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल घोगरे आणि काजल माने यांनी केले तर आभार काजल माने हिने मानले.यावेळी प्रा.मनोज भाळे,प्रा.रुपाली वाघमोडे,प्रा.निवोदिता नलवडे,प्रा. आफ्रिन मोमीन,प्रा. पुजा कोकाटे शिक्षेकेत्तर कर्मचारी  गुंडाराज त्रिगुळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विध्यार्थी - विध्यार्थिनीं व ग्रामस्थ उपस्थित होते.
close