shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विकृत इसमाने ग्रामपंचायत नवीन बांधकाम पाडले


शासकीय मालमत्तेचे नुकसानकेल्या प्रकरणी नगर तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल

  प्रतिनिधी : रफीक शेख

नारायणडोह : १६ /  नगर तालुक्यातील नारायणडोह ग्रामपंचायत कार्यालयचे दरेवाडी मांडवा रोड लगत चौदाव्या वित्त आयोगाच्या स्थानिक विकास निधीतून नवीन सौचालयाचे बांधकाम सुरू आहे. दि.१३ मार्च रोजी संध्याकाळी  सदरचे बांधकाम अज्ञात इसमाने शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्याच्या हेतूने सदर बांधकाम पाडले. 

सकाळी ही घटना नारायणडोह ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ सदर  नारायणडोह ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना  हि हकीकत कळवली . सदर ठिकाणी ग्रामसेवक यांनी नवीन ग्रामपंचायती मालकीचे गट क्रमांक ०२ मध्ये सौचालयाची भिंती चे बांधकाम पाडलेल्या पाहून सदर घटने विषयी अज्ञात इसमाच्या विरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस स्टेशनला  ग्रामसेवक व सरपंच यांनी लेखी तक्रार दाखल केली आली आहे. 

सदर गुन्ह्याचा तपास नगर तालुका पोलिस स्टेशनचे  साह्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक पोलिस उपनिरीक्षक धुमाळ करीत आहे.
close