shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सिनेअभिनेत्री संस्कृती बालगुडे इंडिया स्टार गौरव पुरस्काराने सन्मानित..!


राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. १६-३-२०२२
द रॉयल ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंडिया स्टार गौरव पुरस्कार सोहळा 2022 हा मराठी सिनेसृष्टी वर अधिराज्य गाजवत असलेली रॉयल सिनेअभिनेत्री संस्कृती बालगुडे यांना देण्यात आला आहे .हा पुरस्कार सोहळा अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आला  होता. द रॉयल ग्रुप च्या वतीने विविध क्षेत्रांतील व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्रातील यशस्वी आयोजक नितीन झगरे यांनी आयोजित केला होता.

या सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची असा हा मॉडेलिंग शो होता आणि या शो मध्ये पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सिनेअभिनेत्री संस्कृती बालगुडे-सिनेअभिनेत्री, मा.श्री निलेशजी लंके साहेब, मा.जसवीन कौर छाबडा- समाजसेविका, जयदीप शिंदे-उद्योजक ,युवाक्षी पाटील-मॉडेल, adv रुपालीताई पाटील ठोंबरे- समाजसेविका, प्रतिक्षा अहिरे-मॉडेल, कृष्णकांत लिमये-मॉडेल, रोशनी कदम-मॉडेल आणि ब्रँड अम्बेसिडर , एस.डी.आर फाऊंडेशन अध्यक्षा सीमा अनिल इंग्रोळे कोल्हापुर / मलेशिया -उद्योजिका, दिग्गदर्शक रामकुमार शेडगे, आरती बारसे-मॉडेल, जागृती पाटील-मेकअप आर्टिस्ट ,प्रिया निळे-मेकअप आर्टीस्ट , ईश्वरी मोहिते-मॉडेल, सुवर्णा यादव-मेकअप आर्टीस्ट , धनश्री उबाळे-समाजसेविका, अंजली महाले-मॉडेल, डॉ.त्रिवेणी आठवले-डॉक्टर, रुशिराज पायगुडे मॉडेल , रेणुका ठाणगे-गायकवाड - फोटोग्राफर ,  विद्या बडगुजर-मेकअप आर्टीस्ट , रेखा गोसावी-उद्योजक, आकाश पवार-मॉडेल, डॉ.राहूल पाटील-डॉक्टर,शोभा आढाव-मेकअप आर्टिस्ट ,आयुष कळमकर-मॉडेल, कविता वासू -उद्योजिका ,स्नेहा केसरकर-आरती कोकाटे प्राध्यापिका , सुचिता ढवळे-फिटनेस प्रशिक्षक,नमिता पाटील वास्तु ज्योतिष तज्ञ,चारुशिला प्रकाश माने -वास्तू शास्त्र  तज्ञ,यश शेडगे -मॉडेल, केतना शेठ-मास्टर इन टैरोट कार्ड रिडर ,विद्या कातखडे-प्राध्यापिका, तुषार भाऊ शिंदे-समाजसेवक यांना विविध क्षेत्रांतील व्यक्तींना गौरविण्यात आले आहे.


 या पुरस्कार सोहळयासाठी विविध क्षेत्रांतील पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते.हा पुरस्कार सोहळा भव्य दिव्य असा पार पडला.या शो साठी ब्रायडल वर्ल्ड मेकअप स्टुडिओ रेखा मेमाने, योगिता गोसावी मैडम ,मयुरेश अभ्यंकर सर,तुषारभाऊ शिंदे युवा मंच,डिझाईनर शर्वीन जाधव,निशा शिंदे, अखिल भारतीय मराठी चित्रपट चंदूकाका ज्वेलर्स & सन्स, निर्माता महामंडळ उपाध्यक्ष सुनिल भोसले,हेमंत ज्वेलर्स पुणे श्री. हेमंत दंडगव्हाळ, यश दंडगव्हाळ , गुरूकृपा डिजिटल प्रिंटर्स दिनेश चौधरी यावेळी उपस्थित होते.
close