shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेवा संस्थेच्या जनसेवा मंडळाच्या विद्यमान तिन सदस्यांसह अनेक आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा परिवर्तन मंडळात प्रवेश.. आ.विखे यांच्या जनसेवा मंडळाला सोडचिठ्ठी..!

राहाता । प्रतिनिधी :
लोणी खुर्द गावाचे राजकारण राहाता तालुक्यासह जिल्हात कायम चर्चेचा विषय राहिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोकसंख्येने सगळ्यात मोठी असलेली लोणी खुर्द ग्रामपंचायत परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून सव्वा वर्षापुर्वी विस वर्षानंतर गावाने सत्तांतर घडवुन जनार्दन घोगरे पाटील सरपंच पदी विराजमान झाले आहे. तद्नंतर आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाने परिवर्तन मंडळाच्या चार सदस्यांना आपल्या जनसेवा मंडळात प्रवेश देऊन एकप्रकारे परिवर्तन मंडळ व सरपंच जनार्दन घोगरे पाटील यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन प्रभाताई घोगरे पाटील यांना अटीतटीच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आणून आ विखे व त्यांचे जनसेवा मंडळ यांचा दबाव गावाने झुगारून लावला.

आता लोणी खुर्द विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेचा निवडणुक कार्यक्रम सुरु झालेला असुन सेवा संस्थेत विखे गटाची सत्ता आहे. या निवडणुकीच्या तोंडावर सेवा संस्थेचे तिन विद्यमान सदस्य आनिल आहेर, सिंधुताई घोगरे, भास्कर आहेर यांनी सकाळी शिर्डी मतदारसंघाचे पहिले आमदार स्वर्गीय चंद्रभान दादा घोगरे पाटील यांच्या स्मृतीभवनात जेष्ठ मार्गदर्शक एकनाथराव घोगरे पाटील व सरपंच जनार्दन घोगरे पाटील यांच्या उपस्थितीत परिवर्तन मंडळात प्रवेश करुन एकप्रकारे राधाकृष्ण विखे पाटील व त्याचा जनसेवा मंडळाला मोठा धक्का दिला आहे.

या विद्यमान सदस्यांसोबत  राहाता तालुका दुध संघाचे मा संचालक राजेंद्र आहेर, सेवा संस्थेचे मा सदस्य आशोक आहेर, मा ग्रा.पं.सदस्यत्व प्रकाश ब्राम्हणे, विश्वास ब्राम्हणे, खंडु घोगरे, विजय घोगरे, भाऊपाटील दिघे यांनीही अधीकृत जनसेवा मंडळाला सोडचिठ्ठी देऊन परिवर्तन मंडळात प्रवेश केला.

या वेळी गावातील परिवर्तन मंडळाचे आबासाहेब आहेर, देवमन घोगरे, आप्पासाहेब घोगरे,  कैलास आहेर, श्रीकांत मापारी, बाळासाहेब आहेर, आप्पासाहेब कुरकुटे, विलास घोगरे,  बाळासाहेब कुरकुटे, नासिर शेख, बाबा शेख, ताराचंद घोगरे, संपतराव घोगरे, किरण घोगरे, बाबासाहेब मापारी, तानाजी मापारी, आमोल घोगरे, दिनकर आहेर, दिपक घोगरे, दिलिप घोगरे,रनजित आहेर, चांगदेव गावकरी, सचिन आहेर, सुहास आहेर याच्यासह परिवर्तन मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोणी खुर्द गावांसह परिसरातील सर्व गावातील सर्वसामान्य सर्वधर्मीय समाज बांधव यांनी आमदार चंद्रभान दादा घोगरे पाटील व कुटुंबाला मोठ्या विश्वासाने निस्वार्थी, निस्सीम प्रेम दिलेले असुन त्याच्याशी आम्ही आयुष्यभर बांधील आहोत.

सरपंच जनार्दन घोगरे पाटील
close