shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सपोनि दिनकर मुळे यांची बदली, पोलीस कर्मचा-यांनी दिला निरोप..!



पूर्णा-येथील पोलीस ठाण्यातील कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुळे यांची वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आदेशान्वे नुकतीच पूर्णा येथून परभणीच्या कोतवली पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. त्यांना दि २९ मार्च २०२२ रोजी पूर्णा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी व अन्य मान्यवर व्यक्तींच्या वतीने सत्कार करण्यात येवून निरोप देण्यात आला.

 त्यांनी गत दोन वर्षे कोरोना काळात खूप मोठी कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्यांचा पूर्णा शहरात चांगला बोलबाला होता. अतिशय मनमिळाऊ वृती असलेले सपोनि दिनकर मुळे असी त्यांची ख्याती आहे. आता ते परभणी येथेही आपल्या कार्याचा ठसा उमटवितील हे नक्की. निरोप समारंभ वेळी पूर्णा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, सर्व कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.
close