shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वीज पुरवठा खंडीत केल्याने उचलले टोकाचे पाऊलसंतप्त शेतकरी चढला विद्युत रोहित्रावर..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. गुरूवार दिनांक १७ मार्च २०२२


वीज पुरवठा खंडीत केल्याने उचलले टोकाचे पाऊल
संतप्त शेतकरी चढला विद्युत रोहित्रावर..!!


जामखेड : वीज बिले थकल्याने वीज वितरणच्या अधिकार्‍यांनी विद्युत रोहित्रीचा वीज पूरवठा खंडीने संतप्त झालेल्या जामखेड तालुक्यातील खुरदैठण येथील एका शेतकर्‍याने मंगळवारी दुपारी थेट विद्युत रोहित्रावर (डीपी) चढून वीज तारा हातात घेतल्या. वीज पुरवठा बंद करण्यात आल्याने त्याचा जीव वाचला.
लक्ष्मण भिकाजी कदम असे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे. गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी समजूत काढून त्यांना सुरक्षितपणे खाली घेतले. गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीने थकबाकीपोटी जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. खुरदैठण परिसरातील शेतकर्‍याचे वीज बील थकल्यामुळे विद्युत रोहित्र (डीपी) बंद केली आहेत. कदम यांनी आपल्या शेतात ऊस लावला आहे. मुळात ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे ऊस जळून जात आहे.

त्यातच कदम यांच्या शेता जवळील कदम वस्ती येथील विद्युत रोहीत्र दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना शेताला पाणी देता येत नाही. यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी येथील विद्युत रोहित्रावर चढत वीज तारा हताने धरल्या. वीज कनेक्शन पूर्ववत करा, अन्यथा आत्महत्या करतो, असा इशारा त्यांनी दिला. मात्र, त्यावेळी मेन लाइनमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला होतो. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. याची माहिती मिळाल्यावर खुरदैठनचे सरपंच ओंकार डुचे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ठाकरे, शहाजी डुचे, ग्रामसेवक इम्रान शेख, ऋषिकेश डुचे, अब्बास सय्यद यांच्यासह गावकर्‍यांनी कदम यांची समजुत काढून त्यांना खाली उतरविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.


महावितरण कंपनीने व शासनाकडून सप्टेंबर 2020 ते मार्च 2022 चालू बीले भरणे बंधनकारक आहे. शासनाने सवलत देऊनही थकबाकी वसुल होत नसल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करावे.

- योगेश कासलीवाल, उपअभियंता महावितरण, जामखेड

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close