धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने शहा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी शिवाजीराव इजगुडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:शहा विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक शिवाजीराव इजगुडे यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बिनविरोध जिंकली. चेअरमनपदी शिवाजीराव इजगुडे यांची बिनविरोध निवड झालेबद्दल धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने बाब्रस मळा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास मंडळाचे विश्वस्त श्रीधर बाब्रस, मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस, माजी. नगरसेवक राजेंद्र चौगुले, पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे, माजी नगराध्यक्ष सुरेश गवळी, प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर एकनाथराव गारदी, मा.कार्यकारी अभियंता श्री पांढरे साहेब, भाजपचे नेते माऊली वाघमोडे, अनिल चव्हाण, दत्तू शिंदे, गणेश गोरे, मनोज भापकर, अभिजित भुजबळ, समीर दुधनकर, बापू भिसे, रमेश बनसोडे, संतोष काळे, अस्लम शेख इ. बहुसंख्येने उपस्थित असल्याची माहिती राजेंद्र चौगुले यांनी दिली.

